भाजपच्या या उमेदवाराचा तब्बल 2.14 लाख मतांनी विजय, पाहा कोण आहे तो उमेदवार

Assembly Election Result 2022 : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काही उमेदवारांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय मिळवला आहे. पाहा कोणत्या राज्यात कोणी मिळवला सर्वाधिक मतांनी विजय.

Updated: Mar 10, 2022, 09:00 PM IST
भाजपच्या या उमेदवाराचा तब्बल 2.14 लाख मतांनी विजय, पाहा कोण आहे तो उमेदवार title=

Election Result 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये सर्वात मोठा आणि छोटा विजय भाजपच्या नावावर झालाय. साहिबाबादमध्ये भाजपचे सुनील कुमार शर्मा यांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. त्यांनी तब्बल 2.14 लाख मतांनी विजय मिळवलाय. (Biggest Victory in Assembly Election 2022)

सुनील कुमार शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या अमरपाल शर्मा यांचा 2.14 लाख मतांनी पराभव केला. या निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय आहे.

पंजाबमधील सर्वात मोठा विजय

पंजाबच्या मानसामध्ये आम आदमी पक्षाच्या डॉ. विनय सिंगला यांनी काँग्रेसच्या शुभदीप सिंग सिद्धू यांचा 63,223 मतांनी पराभव केला. 

गोव्यातील सर्वात मोठा विजय

गोव्यातील पोरियाम येथे भाजपच्या देविया विश्वजित राणे यांनी आपच्या विश्वजित राणे यांचा 13,943 मतांनी पराभव केला. हा राज्यातील सर्वात मोठा विजय होता. 

मणिपूरमधील सर्वात मोठा विजय

मणिपूरच्या चंदेल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या एसएस ओलिश यांनी नागा पीपल्स फ्रंटच्या लंगू पल्हरिंग अनल यांचा 27,341 मतांनी पराभव केला. मणिपूरचा हा सर्वात मोठा विजय होता.