वीरेंद्र सेहवागचे भावनिक आवाहन, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय.  

Updated: Jun 20, 2018, 06:02 PM IST
वीरेंद्र सेहवागचे भावनिक आवाहन, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहिला तर डोळे पाणावतात. सामाजिक विषयांवर सेहवाग नेहमीच ट्विट करीत आलाय. मात्र, या व्हिडिओमुळे लोकांना माती खाण्याची वेळ आलेय. हे अधोरेखीत झालेय. त्यामुळे समाजातील लोकांनी अन्न वाया घालवू नये किंवा फेकून देऊ नये, असे सांगण्याचा हेतू या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलाय. सेहवागने एक भावनिक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

धक्कादायक, मातीची चपाती

हैतीमधील एक व्हिडिओ सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंडवर पोस्ट करत उरलेले जेवण टाकून न देण्याचे आवाहन केले आहे. सेहवागने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हैतीमधील लोक मोठ्या कढाईमध्ये पाणी टाकून माती कालवताना दिसत आहेत. त्यानंतर या मातीला चपातीचा आकार देऊन उन्हामध्ये सुकवताना दिसत आहेत. माती सुकल्यानंतर येथील लोकं फक्त मीठ टाकून ही मातीची चपाती खाताना दिसत आहेत.

भावनिक आवाहन

या व्हिडिओसोबत वीरेंद्रने लोकांना भावनिक आवाहन केले आहे. 'गरिबी. हैतीमधील लोकं माती आणि मीठाच्या चपात्या खात आहेत. प्लीज. प्लीज जेवण टाकून देऊ नका. जे आपल्याला आवश्यक वाटत नाही ते कोणासाठी तरी खूपच महत्त्वाचे आहे. तुमचे उरलेले जेवण गरजू लोकांना दान करा किंवा अशा संस्थेला द्या जे गरिबांपर्यंत जेवण पोहोचवतात', असे कॅप्शन देऊन विरूने हा व्हिडिओ शेअर केला आहे.