अंदमान : अंदमान-निकोबार द्वीप समूहामध्ये सोमवारी पहाटे दोन तासात मध्यम तीव्रतेचे नऊ झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने यासंदर्भातील माहिती दिली. भुकंपाचा पहिला झटका हा सकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी आला. याची तीव्रता 4.9 इतकी होती. याच्या काही मिनिटांतच पाच अन्य भुकपांचे झटके जाणवले. 6 वाजून 54 मिनिटांनी भुकपांचा अखेरचा झटका जाणवला. याची तीव्रता 5.2 असल्याचे सांगण्यात येत आहे. अंदमान निकोबार द्वीप भुकंपासाठी खूपच संवेदनशील क्षेत्र आहे.
Earthquake of magnitude 4.8 struck Nicobar Islands region at 6:04 am today.
— ANI (@ANI) April 1, 2019
23 मार्च रोजी इथे भुकंपाचे धक्के जाणवले होते. 5.1 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा तो भूकंप होता. त्याआधी याआधी 11 मार्च तसेच 17 जानेवारीला देखील अंदमान निकोबार इथे भूकंपाचे हादरे जाणवले होते. 11 मार्चचा भूकंप तीव्रता 4.8 रिस्टर स्केलवर तर 17 जानेवारीचा भूकंप हा 6.6 स्केलचा भूकंप होता.