पॅन-आधार जोडण्याची मुदत वाढवली

पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Updated: Dec 30, 2019, 10:28 PM IST
पॅन-आधार जोडण्याची मुदत वाढवली title=

नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच ही मुदत होती. आयकर विभागाने सोमवारी ही मुदत वाढवत असल्याची माहिती दिली.

आधार-पॅन कसं लिंक कराल?

- सगळ्यात पहिले आयकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा

- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला साईडला एक लाल रंगाचं बटण दिसेल. या बटणावर 'लिंक आधार' असं लिहिलं असेल.

- जर तुमचं अकाऊंट बनलं नसेल तर तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल. लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर आपोआप एक पेज ओपन होईल.

- लॉगिन केल्यानंतर वरती दिसत असलेल्या प्रोफाईल सेटिंग उघडा आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या ऑप्शनवर जा

- हा ऑप्शन उघडल्यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे. हे भरल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होईल.

जर तुम्हाला वेबसाईटवरुन आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला अडचण येत असेल तर तुम्ही मोबाईलवरूनही हे करु शकता. 567678 किंवा 56161 वर एसएमएस करुन तुम्ही आधार आणि पॅन कार्ड लिंक करु शकता. 

आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला ऑनलाईन आयटीआर भरायला अडचण येईल तसंच तुमचा टॅक्स रिफंडही यामुळे अडकू शकतो. 

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक करण्यासाठी इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कन्फर्मेशन द्यावं लागणार आहे. पॅन कार्ड आधार कार्ड लिंक झालेलं आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन पाहावं लागणार आहे.