चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थीनीच्या धाडसाने टळला मोठा अपघात

Shocking Story : स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) हारूण भाई विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला निघाला होता. विद्यार्थ्यांना सोडताना त्यांना बस चालवताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack)आला होता. यावेळी त्याने ही परिस्थिती विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला. 

Updated: Feb 7, 2023, 03:13 PM IST
चालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थीनीच्या धाडसाने टळला मोठा अपघात  title=

Shocking Story : स्कुल बस चालकाला (School Bus Driver) ड्रायव्हिंग करताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा अपघात (Accident) होण्याची शक्यता होती. मात्र एका विद्यार्थीनीने दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अपघात टळला आहे. या विद्यार्थीनीच्या धाडसाचे आता कौतूक होतेय. तसेच तिच्या शाळेने देखील तिच्या या धाडसाची दखल घेतली आहे. दरम्यान नेमका हा घटनाक्रम काय होता? हे जाणून घेऊयात.  

घटनाक्रम काय? 

स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) हारूण भाई विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला निघाला होता. विद्यार्थ्यांना सोडताना त्यांना बस चालवताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack)आला होता. यावेळी त्याने ही परिस्थिती विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांना बोलता येत नव्हती, बस डगमगत होती. तसेच बोलता बोलता त्यांचे डोकं थेट स्टेअरींगवर आदळले होते. या घटनेदरम्यान बसच्या काहीच दुर अंतरावर सिग्नल लागला होता. त्यामुळे अनेक गाड्या सिग्नल क्लिअर होण्याची वाट पाहात होत्या.तसेच अनेक लोक सिग्नलमुळे रस़्ता देखील ओलांडत होते. त्यामुळे जर हि बस सिग्नलच्या दिशेने भरधाव गेली असती, तर अनेक गाड्यांना तिने धडक दिली होती. या धडकेत मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र विद्यार्थीनीने दाखवलेल्या बहादूरीमुळे मोठा अपघात टळला आहे. 

विद्यार्थीनीने असे वाचवले जीव

स्कुल बस ड्रायव्हरला (School Bus Driver) ज्यावेळेस हार्ट अटॅक (Heart Attack) आला त्यावेळेस विद्यार्थीनी त्याच्या बाजूला असलेल्या सीटवर बसली होती. ती बस ड्रायव्हरशी बोलत होती. या दरम्यान ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला होता. त्याला हार्ट अटॅक आल्याचे पाहून आणि समोर सिग्नल लागल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती लक्षात घेऊन तिने लगेच स्टेअरींग हातात धरून दुसऱ्या दिशेने वळवले. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या क्रेटाला स्पर्श करत विजेच्या खांबाला धडकल्याने बस थांबली. अशाप्रकारे या विद्यार्थीनीने स्वत:सह बस ड्रायव्हरचे आणि नागरीकांचे देखील प्राण वाचवले,  

जर विद्यार्थीनीने स्टेअरिंग हाताळले नसते तर सिग्नल बंद असल्याने उभ्या असलेल्या अनेक गाड्यांवर बस उलटली असती आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले असते, असे प्रत्यक्षदर्शींनीचे म्हणणे आहे. या घटनेनंतर नागरीकांची गर्दी जमली आणि त्यांनी तत्काळ 108 ला माहिती दिली. यानंतर स्कूल बसचा चालक हारूण भाई यांना बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान मोक्याच्या क्षणी बहादूरी दाखवणाऱ्या 12 वीच्या विद्यार्थीनीचे नाव भार्गवी व्यास आहे. भार्गवी व्यासच्या या धाडसामुळे मोठा अपघात टळला आहे. तिच्या या बहादूरीमुळे आता तिच्या शाळेत देखील तिचा गौरव करण्यात आला आहे. गुजरातच्या (Gujarat News) राजकोटमध्ये ही घटना घडलीय.