तिरुचिरापल्ली : तमिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli)जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी दोन वर्षांचा बोअरवेलमध्ये मुलगा पडल्याची घटना घडली. शुक्रवारपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दलाकडून मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुजीत विलसन नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. पडल्यावर तो ३० फुटांवर अडकला. पण नंतर मुलगा आणखी खाली जात जवळपास १०० फुटांवर अडकला आहे. बोअरवेल निकामी झाल्यानंतर ते तसंच खुलं ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.
राहुल गांधींनीही मुलाबाबत चिंता व्यक्त करत त्याची सुरक्षेसाठी तसंच लवकर सुटकेसाठी प्रार्थना केली आहे.
While the nation celebrates Deepavali, in Tamil Nadu a race against time is underway to save baby Surjeeth, who has been trapped in a borewell since Friday. I pray that he will be rescued & reunited with his distraught parents at the earliest #savesurjeeth
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 27, 2019
#UPDATE Tamil Nadu: Drilling process underway to rescue 2-year-old Sujith Wilson who fell into a 25 ft deep borewell in Nadukattupatti, Tiruchirappalli on 25th October. pic.twitter.com/eUVvb2ANjV
— ANI (@ANI) October 28, 2019
#SaveSujith: Over 52 hours on, rescue ops continue to save Tamil Nadu toddler who fell into borewell
Read @ANI Story | https://t.co/UoGM6XdaCW pic.twitter.com/xYdWYCmPv4
— ANI Digital (@ani_digital) October 27, 2019
शुक्रवारपासून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुरुवातीला मुलापर्यंत पोहचण्यासाठी बोअरवेलजवळ खड्डा खोदण्यास मशीन्स मागवण्यात आल्या. परंतु तो भाग खडकाळ असल्याने, तसंच खड्डा खोदताना कंपने तयार होतात. ज्यामुळे माती अधिक बोअरमध्ये जाऊन, मुलगा आणखी खोलवर जाण्याचा धोका होता. त्यामुळे खड्डा खोदण्याचं काम थांबण्यात आलं.
त्यानंतर बचाव पथकाकडून 'बोअरवेल रोबोट' या उपकरणाचा वापर करण्यात आला. मात्र तो असफल ठरला. अनेक टीमकडून अनेक प्रकारे मुलाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात सुरु आहेत. परंतु अद्यापही त्याला बाहेर काढण्यास यश आलेले नाही.