डेल्टा प्लसचं टेन्शन घेऊ नका; धोकादायक नाहीच: CSIR च्या शास्त्रज्ञांचा दावा

डेल्टा किंवा डेल्टा प्लस वेरियंट खरंच धोकादायक आहे का? याबाबत सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिलासादायक प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Jun 28, 2021, 01:56 PM IST
डेल्टा प्लसचं टेन्शन घेऊ नका; धोकादायक नाहीच: CSIR च्या शास्त्रज्ञांचा दावा title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढल्याने धोका वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही निर्बंध लावण्यात आले आहे. परंतु डेल्टा किंवा डेल्टा प्लस वेरियंट खरंच धोकादायक आहे का? याबाबत सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिलासादायक प्रतिक्रिया दिली आहे.

डेल्टा प्लस वेरियंट धोकादाय नाही. त्याचा लहान मुलांवरदेखील परिणाम होत नाही. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे. डेल्टा प्लस घातक वेरियंट नसल्याचा अहवाल सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला पाठवला आहे. सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

लोकांनी डेल्टा प्लसला घाबरू नये. हा वेरियंट घातक असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेने हे संशोधन केले आहे. महाराष्ट्रात दोनच जिल्ह्यात डेल्टा प्लस वेरियंट सापडले असल्याचे डॉ. मांडे यांनी म्हटले आहे.