टिपू सुलतान क्रूर, बलात्कारी शासक - मंत्र्याचे आरोप

कर्नाटक सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंबंधीचं पत्र लिहून टिपू सुलतान जयंती कार्यक्रमात आपलं नाव लिहू नका, असं हेगडे यांनी सांगितलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 21, 2017, 10:41 PM IST
 टिपू सुलतान क्रूर, बलात्कारी शासक - मंत्र्याचे आरोप title=

नवी दिल्ली :  कर्नाटकमध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला नकार दिला आहे. 

जयंती कार्यक्रमात माझं नाव लिहू नका

कर्नाटक सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंबंधीचं पत्र लिहून टिपू सुलतान जयंती कार्यक्रमात आपलं नाव लिहू नका, असं हेगडे यांनी सांगितलं आहे. टिपू सुलतान हा एक क्रूर आणि बलात्कारी शासक होता. त्याने प्रचंड नरसंहार केला. 

टिपू सुलतान, क्रूर, बलात्कारी शासक - हेगडे

कर्नाटक सरकार असल्या राजाची जयंती साजरी करते असेल, तर आपल्याला या कार्यक्रमात अजिबात स्वारस्य नसल्याचं अनंत कुमार हेगडे यांनी म्हंटलंय. यावरुन, कर्नाटकमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. 

धार्मिक रंग देण्याची गरज नव्हती-मुख्यमंत्री सिद्धरामय्या

दरम्यान, केंद्रीय मंत्री असल्याने अनंत कुमार हेगडे यांनी अशा प्रकारे पत्र लिहून टिपू सुलतान जयंतीला धार्मिक रंग देण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. 

२०१५ पासून कर्नाटक सरकारकडून टिपू सुलतान जयंती

अभिनेते संजय खान यांनी, अनंत कुमार हेगडे यांच्या या विधानावर आक्षेप घेतला आहे. कर्नाटक सरकार १० नोव्हेंबरला टिपू सुलतान जयंतीचा कार्यक्रम करणार आहे. २०१५ पासून कर्नाटक सरकार टिपू सुलतान जयंती साजरी करतं आहे.