वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहिर केलाय.
पॅरिस करारानं भारत आणि चीनसारख्या देशांना या करारामुळे अवाजवी फायदा होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय. २०१५ मध्ये जगातल्या १९० देशांनी पॅरीसमध्ये ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःची लक्ष्य निर्धारित केली. ही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जगभरातली राष्ट्र एकमेकांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाची मदत करतील, असं या करारात म्हटलं गेलं होतं.
दरम्यान, अमेरिकनं निश्चित केलेली लक्ष्य २०२५ पर्यंत पूर्ण करायची असतील, तर अमेरिकच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन बेरोजगारी वाढेल, असा ट्रम्प यांचा दावा आहे. त्याचप्रमाणे कोळशा आधारित वीज निर्मिती करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या देशांना अब्जावधी डॉलरची अवाजवी मदत मिळेल, असंही ट्रम्प यांनी करारातून बाहेर पडताना म्हटलंय.