नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये सुरू असलेल्या वादाला एक नवीन वळण लागले आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताला या प्रकरणात कुटनितीमध्ये विजय मिळताना दिसत आहे.
चीन डोकलाममधून मागे हटण्याचा भारताच्या मागणीवर आंशिकदृष्ट्या तयार झाला आहे. यासाठी त्याने एक अटही टाकली आहे. पण अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
गुरूवारी एक बातमी आली की चीनने या भागात आपल्या सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसेच रणगाड्यांची संख्याही ८० पर्यंत वाढवली आहे.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी डोकलामच्या वादग्रस्त पाइंटपासून १०० मीटर मागे हटण्यास तयार आहे. भारतीय सेनाने चीनी सेनाला डोकलामपासून २५० मीटर मागे जाण्यास सांगितले होते. पण आता त्याचे सैन्य १०० मीटर मागे हटण्यास तयार आहे. पण असे झाल्यास भारतीय सैन्यालाही आपल्या पूर्वीच्या ठिकाणी जावे लागले.
डोकलाम सीमेवरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झालाय. भारत हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, चीनकडून सातत्याने उलट-सुलट वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे तणावात अधिक भर पडत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमेवरील गावे खाली करण्याचे आदेश दिलेत.