Narayana Murthy: भारतात असे अनेक कर्तृत्वान उद्योजक आहेत ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. त्यातीलच एक मोठं नावं म्हणजे नारायण मुर्ती (Narayana Murthy). त्यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीला (Infosys) नुकतीच 40 वर्षे पुर्ण झाली आहेत. कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती (Narayana Murthy 6.20 am) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या कष्टानं या कंपनीला मोठं केलं आहे. खिशात कमी पैसे असताना त्यांनी इन्फोसिससारखी मोठी कंपनी स्थापन केली. मित्रांसोबत मिळून त्यांनी आपल्या पत्नीकडून म्हणजेच सुधा मुर्ती यांच्याकडून 10 रूपये उसने घेऊन या कंपनीची स्थापना केली होती. नारायण मुर्ती हे आपल्या भाषणानं सगळ्यांनाच प्रेरित करत असतात. सध्या त्यांच्या मुलाखतीतलं (Narayana Murthy Interview) असाच एक किस्सा सगळीकडे व्हायरल होतं आहे. नारायण मुर्ती हे आपल्या ऑफिसमध्ये दररोज सकाळी 6.20 ला उठायचे. परंतु यामागील कहाणी तुम्हाला माहितीये का? (do you why infosys founder narayana murthy used to come to office at 6.20 am in the morning her is why)
सध्या नारायण मुर्ती हे दुसऱ्या एका कारणानंही चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांचे जावई म्हणजे त्यांची मुलगी अक्षता मुर्ती यांचे पती ऋषी सुनक (Rushi Sunak) हे इंग्लंड देशाचे पंतप्रधान झाले आहेत. आपल्या जावयाच्या नव्या वाटचालीसाठीही त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एका मुलाखतीदरम्यान नारायण मुर्ती म्हणाले की त्यांना वेळेचं मूल्य आणि वेळेचं व्यवस्थापन (Narayana Murthy Time Management) समजलं आहे आणि इतरांना याचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. याचे महत्त्व त्यांना सगळ्यांसमोर सेट करायचे आहे, म्हणून ते दररोज सकाळी 6.20 वाजता इन्फोसिसच्या (infosys office) कार्यालयात पोहोचयाचे असं ते म्हणाले. कॉर्पोरेट क्षेत्रात वेळेचे महत्त्व आहे. त्यामुळे आपण टीमवर्कनं यशापर्यंत पोहचू शकतो. कायम कामत तत्पर राहणारे नारायण मुर्ती एका गोष्टीबद्दल आपली खंतही व्यक्त करतात ते म्हणतात की, कामाच्या व्यापामुळे मी माझ्या मुलांना अक्षता आणि रोहनला फार वेळे देऊ शकलो नाही. माझी पत्नी सुधा त्यांच्याकडे लक्ष देत असे.
एका पत्रकारानं त्यांना विचारलं की रोज सकाळी सात वाजता तुम्ही कार्यालयात पोहचत होतात? एका मुलाखतीदरम्यान पत्रकारानं नारायण मुर्ती यांना त्यांच्या इन्फोसिसच्या दिवसांची आठवण करून दिली होती तेव्हा त्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तरं देत नारायण मुर्ती (Narayana Murthy Wife) म्हणाले की, मी येथे दुरूस्त करू इच्छितो की सकाळी 7 ऐवजी मी रोज सकाळी 6.20 वाजता कार्यालयात पोहचत होतो आणि माझं काम मी रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत करायचो. मला माझ्या कामाचा आणि वेळेचा लोकांसमोर आदर्श ठेवायचा होता. ते म्हणाले की मी माझं काम जेव्हा सुरू केलं आणि 2011 मध्ये मी जेव्हा माझं काम सोडलं तेव्हापर्यंत दररोज मी 6.20 लाच ऑफिसला पोहचत होतो. हे करण्यात मी यशस्वी झालो कारण माझं हे पाहून माझ्या ऑफिसमध्ये येणारे कर्मचारीही वेळेवर कार्यालयात येऊ लागले, अशीही माहिती त्यांनी दिली.