SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे का? बातमी वाचा आणि फायदे जाणून घ्या

शेअर बाजारातील चढ-उतार पाहता म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील असते.

Updated: Oct 3, 2022, 03:38 PM IST
SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे का? बातमी वाचा आणि फायदे जाणून घ्या title=

Investment In SIP: शेअर बाजारातील चढ-उतार पाहता म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील असते. असं असलं तरी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थेट इक्विटी मार्केटमधील (Equity Fund) गुंतवणुकीपेक्षा कमी जोखमीची असते. अशा परिस्थितीत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. डिजिटायझेशनमुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment) करणे खूप सोपे झाले. SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे 5 फायदे जाणून घ्या.

- एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गरज नाही. एसआयपीच्या अनेक योजनांमध्ये तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तुम्ही गुंतवणुकीवरील जोखीम आणि त्यावरील परतावा यांचे सहज आकलन करू शकता.

- SIP द्वारे गुंतवणूक करताना नियमित बचत आणि गुंतवणूक ही सवय बनते. यामध्ये तुम्हाला ठराविक तारखेला ठराविक रक्कम जमा करावी लागते. 

- SIP मध्ये गुंतवणूक करताना तुमचे बँक खाते लिंक असतं. या खात्यातून विशिष्ट तारखेला पूर्व-निर्धारित रक्कम कापली जाते.

Knowledge News: एक Train तयार करण्यासाठी किती खर्च येतो माहिती आहे का? जाणून घ्या

- म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यात ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा असावा. यामध्ये पॅन आणि आधार देखील आवश्यक आहे.

- SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही अंदाजित निधीचा अंदाज लावू शकता. फंडाच्या मागील कामगिरीच्या आधारे आगामी वर्षांतील अंदाजे वार्षिक वाढ जाणून घेऊन फंडाचा अंदाज घेणे सोपे आहे.