मोबाईल फोनचे ३ प्रकार असतात, पाहा तुमचा कोणता असेल?

मोबाईचे तीन प्रकार आहेत आणि तिघांचेही स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे. 

Updated: Jul 18, 2021, 09:59 PM IST
मोबाईल फोनचे ३ प्रकार असतात, पाहा तुमचा कोणता असेल? title=

मुंबई : आज आपल्यापैकी प्रत्येत व्यक्तीकडे मोबाईल आहे. आता कोरोना कालानंतर तर ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे तर प्रत्येक लहान मुलाच्या हातात देखील आता मोबाईल आहे. सर्व प्रकारच्या आकडेवारी ठेवणारी एक प्रतिष्ठित वेबसाइट statista.comच्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये जवळपास 69 कोटी लोकांकडे स्मार्टफोन होता. यामध्ये काही लोकांकडे एक मोबाइल आहे, तर काहींकडे 3 ते 4 मोबाइल देखील असू शकतात. परंतु तुम्ही कधीही विचार केला आहे का? की तुम्ही वापरत असलेला मोबाईल कोणता आहे? आता तुम्ही म्हणाल की हा प्रश्न कशासाठी आता सगळ्यांकडे तर स्मार्टफोनच असतात. परंतु असे नाही प्रत्येक फोन हा स्मार्टफोन नसतो.

मोबाईचे तीन प्रकार आहेत आणि तिघांचेही स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे. आम्ही तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. जेणेकरून तुमच्या हातातील किंवा तुम्ही वापरत असलेला मोबाईल नक्की कोणत्या प्रकारचा आहे? हे तुम्हाला समजेल.

तीन प्रकारचे मोबाइल फोन असतात

फोनचा एक प्रकार म्हणजे सेल फोन, दुसरा प्रकार म्हणजे फीचर फोन आणि तिसरा म्हणजे स्मार्टफोन, जो आजकाल सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. जगातील सर्व कंपन्या सध्या या प्रकारचे फोन बनवले जात आहेत.

आता यामधील फीचर वाचा आणि माहित करुन घ्या की, तुमचा फोन नक्की कोणता

सेल फोन : सगळ्यात जो मोबाइल लाँच केला गेला होता, त्याला सेल फोन म्हटले जाते. या सेल फोनचे कार्य म्हणजे एखादी व्यक्ती कॉल करू आणि कॉल प्राप्त करू शकेत होती. याद्वारे, ग्राहक संदेश पाठवू आणि प्राप्त करु शकतो. सुरवातीच्या काळात सेल फोन खूप महाग असायचे. प्रथम सेलफोन हा वर्ष 1973 मध्ये मोटोरोला कंपनीने बाजारात आणला आणि त्याचे वजन सुमारे दोन किलो होते. परंतु जो पहिला फोन कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केला होता त्याचे नाव मोटोरोला डायनाटाक DynaTAC 8000X होते.

परंतु हा फोन आता 1 हजार रुपयांच्या आता देखील तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. 

फीचर फोन : जसजसे तंत्रज्ञान बदलत गेले तसे तसे कंपनीने फोनमध्ये आणखी फीचर त्यामध्ये समाविष्ट करत गेले. यामध्ये नोकिया आणि मोटोरोला या दोन कंपन्या आहेत ज्यांनी सुरलातीला या व्यवसायात प्रवेश केला. नवीन तंत्रज्ञानाने बनवलेल्या फोनला फीचर फोन असे म्हणतात.

या फोनमध्ये लोकांना फोन कॉल आणि संदेशासह एमपी 3 गाणी आणि एमपी 4 व्हिडीओ पाहण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. काही फोनमध्ये व्हिडीओ गेम फीचर देखील आहे. तुमच्यापैकी बर्‍याच जणांना कदाचित हे आठवेल, सुरुवातीच्या नोकिया फोनमध्ये सापाचा खेळ होता.

ते फोन वैशिष्ट्यपूर्ण फोन होते. नंतर कंपन्यांनी फीचर फोनमध्ये हळूहळू बदल करणे सुरू केले आणि नंतर त्यामध्ये ब्ल्यूटूथ देखील आणले गेले होते.

स्मार्टफोन : ज्या फोनमध्ये इंटरनेट, कॅमेरा, ब्लूटूथ, स्टोरेज, अ‍ॅप्स, डाउनलोड इत्यादी सुविधा आहेत, तो म्हणजे स्मार्टफोन.

मीडिया रिपोर्टनुसार, तैवानची कंपनी HTCने जून 2009मध्ये भारताचा पहिला स्मार्टफोन बाजारात आणला होता. त्याची किंमत सुमारे 30 हजार रुपये होती. पूर्वीचे स्मार्टफोन हे अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालत असत, जे अजूनही विक्रले जाताता.

परंतु आताचे फोन हे अॅपलच्या प्लॅटफॉर्मवर देखील चालतात. असे असले तरी ही, अजुनही बरेच लोकं तुम्हाला फिचर फोन किंवा सेल फोन वापरताना दिसतील. हे फोन वापरण्याचे लोकांचे स्वत:चे वेगळे असे फायदे आहेत.