Uber Driver Complaint About Girls: आपण एखाद्या कार, रिक्षा किंवा बसमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरला (Driver) दादा किंवा काका नावाने हाक मारतो. पण अनेकदा ड्रयव्हर्सना ही गोष्ट खटकते. त्यामुळे ड्रायव्हर काही वेळा नाराज होतात, तर काही संतापतात. एवढंच नाही तर, तरुण ड्रायव्हरला काका म्हटलं तर त्यांना आणखीनच राग येतो. अशावेळी मुलांनी आणि मुलींनी थोडी काळजी घ्यायला हवी. महिलांनी ड्रायव्हरला दादा किंवा काका म्हणू नये म्हणून एका व्यक्तीने अणोखी शक्कल लढवली आहे.
एका Uber ड्रायव्हरने चक्क गाडीच्या सीट मागे 'मला दादा आणि काका म्हणू नका...' (Girls Called Bhaya And Uncle) असं लिहिलं. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर अनेकांनी फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे. पाहा फोटो...
@Uber_India pic.twitter.com/S8Ianubs4A
— Sohini M. (@Mittermaniac) September 27, 2022
सोहिनी एम या ट्विटर युजरने कारच्या सीटचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये उबेर ड्रायव्हरने महिला प्रवाशांसाठी एक सुचना लिहिल आहे. ड्रायव्हरने पुढच्या सीटच्या मागच्या बाजूला हा महत्त्वाचा 'मला दादा आणि काका म्हणू नका...' असं लिहिलं आहे. (Uber Tweet)
ड्रायव्हरच्या विनोदबुद्धीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त Uber ड्रायव्हरने महिलांना दिलेल्या सल्ल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ड्रायव्हरचे त्याच्या अलौकिक कल्पनेबद्दल कौतुक केले, तर काहीजण ड्रायव्हरला काय म्हणून हाक मारायची असा प्रश्न उपस्थित केला आहे.