Diwali 2022 : PM Modi अयोध्या नव्हे, 'या' ठिकाणी Diwali साजरी करणार

PM Modi : आज लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी...पंतप्रधान नरेंद्र मोदी सालाबादप्रमाणे यावर्षीही सैनिकांसह दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत नाही तर या भागातील जवानांसोबत मोदी दिवाळी साजरी करणार आहेत.   

Updated: Oct 24, 2022, 08:09 AM IST

Diwali_2022_PM_Modi

PM Modi Celebrate Diwali with the soldiers : कोरोना महासंकटानंतर यंदा दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीचा सण हा लख प्रकाशाचा सण...आज घरोघरी दिव्यांची आरास करण्यात येणार...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये दीपोत्सव ( Ayodhya Deepotsav) साजरा केला. शरयू नदीच्या किनारी भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यंदा या घाटावर 17 लाख पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. आज लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी...पंतप्रधान नरेंद्र मोदी सालाबादप्रमाणे यावर्षीही सैनिकांसह दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) जवानांसोबत नाही तर या भागातील जवानांसोबत मोदी दिवाळी साजरी करणार आहेत. 

'या' जवानांसोबत साजरी करणार दिवाळी 

पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधल्या (Uttarakhand) माणा या अतिउंचीवरील खेडेगावातल्या पोस्टवर दिवाळी साजरी करणार आहेत. माणा गाव हे भारत चीन सीमेवरचं अखेरचं खेडेगाव आहे. 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या गावात भारत चीन सीमेचं रक्षण करणा-या सैनिकांचा (soldiers) तळ आहे. या ठिकाणी पंतप्रधान आज भेट देणार आहेत. सैनिकांसह दिवाळी साजरी करून पंतप्रधान माणा गावातल्या ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. (Diwali 2022 PM Modi celebrate diwali soldiers nmp )

पंतप्रधान मोदी 2014 पासून देशाच्या सीमांवर उभ्या असलेल्या सैनिकांसह दिवाळी साजरी करत आहेत. पंतप्रधान माणा गावात सैनिकांना मिठाईचं वाटप करून त्यांच्याशी संवादही साधतील. गेल्यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या नौशेराला त्यांनी भेट दिली होती.