नवी दिल्ली : मराठी राजभाषा दिन (Marathi Language Day) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मराठी राजभाषा दिन जसा जसा जवळ येतो तसं तसं राजकारण्याचं मराठी प्रेम उफाळून येतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (marathi classical language status) मिळावा, ही मागणीही अगदी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवरच आणखी जोर धरते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठीच्या अभिजात दर्जाचं घोंगडं भिजत पडलंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा विषय हा लालफितीत अडकला आहे. (discussion on marathi classical language status in rajya sabha during to question hour 3 feburary priyanka chaturvedi and arjun ram meghwal)
दरम्यान, या मुद्द्यावरुन गुरुवारी 3 फेब्रुवारीला राज्यसभेत प्रश्नकालादरम्यान चर्चा पार पडली. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanaka Chaturvedi) आणि राज्य सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांच्यात चर्चा पार पडली. या चर्चेत पद्धशीर टोलवाटोलवी पाहायला मिळाली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळणार, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी उपस्थित केला होता. मात्र राऊत गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembaly Election 2022) व्यस्त असल्याने ते सभागृहात उपस्थित नव्हते. राऊतांनी प्रश्न विचारण्याची जबाबदारी चतुर्वेदी यांच्याकडे दिली.
अर्जुन राम मेघवाल काय म्हणाले?
"गृह, सांस्कृतिक आणि शिक्षण या 3 मंत्रालयात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चर्चा सुरु आहे. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ जावा लागतो. सध्या हा विषय साहित्य अकादमीकडे आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल", असं आशावादी उत्तर मेघवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिलं.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत राज्यसभेत झालेली चर्चा
In my supplementary question on the delay in giving a classical language status to Marathi despite repeated request from state government MPs, Hon. Minister has assured that a positive decision will be taken soon.
Jai Maharashtra! pic.twitter.com/qz42tKpF1k— Priyanka Chaturvedi (@priyankac19) February 3, 2022