लग्नात आता 7 नाही 8 वचन द्यावे लागतील, त्याशिवाय लग्न अपूर्णच, काय आहे विशेष समजून घ्या!

लग्नातील आठव्या वचनाचं महत्त्व. 

Updated: Mar 5, 2021, 08:53 PM IST
लग्नात आता 7 नाही 8 वचन द्यावे लागतील, त्याशिवाय लग्न अपूर्णच, काय आहे विशेष समजून घ्या! title=

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न या नात्याला  विशेष महत्त्व असतं. पती-पत्नी अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदी घेतात आणि या सात वचनांना वैवाहिक आयुष्यात फार महत्त्व आहे. पण तुम्ही आतापर्यंत कधी आठव्या वचनाबद्दल ऐकलं आहे.  जर तुम्हाला लग्न गाठ बांधताना आठव्या वचना बद्दल माहिती नसेल तर, या आठव्या वचनाबद्दल विशेष काय आहे, ते समजून घ्या. त्याला कारणही तसचं  आहे.  सध्या आठव्या वचनाची चर्चा जोरदार रंगत आहे.  सांगायचं झालं तर  वचनांशिवाय आणि सात फेऱ्यांशिवाय  लग्न अपूर्ण मानलं जात. 

पण आता पती-पत्नी सात फेऱ्याऐवजी आठ फेरे घेत एकमेकांना आठ वचन देतात.  आठवं वचन  प्रत्येक जण  आपल्या मर्जीनुसार घेतात. हे  आठवं  वचन ऐकल्यानंतर तुम्ही देखील पोट  धरून हसाल. लग्नाचं हे आठवं वचन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आठवं वचन शेअर केलं आहे. आठवं वचन म्हणजे लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर पतीने त्याचं ATM कार्ड  पत्नीला द्यावं आणि पासवर्ड पत्नीच्या कानात सांगावा. असं हे आठवं वचन आहे.