नोटाबंदी : डिजिटल पेमेंटमध्ये ८० टक्क्यांची वाढ

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदी लागू झाल्यानंतर डिजीटल पेमेंटमध्ये आधीच्या तुलनेत ८० टक्क्यांची वाढ झालीये. अधिकृत आकड्यांनुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अखेरपर्यंत डिजिटल देवाण-घेवाणीत साधारण १८०० कोटी रुपयांपर्यंतची  वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

Updated: Nov 4, 2017, 08:04 PM IST
नोटाबंदी : डिजिटल पेमेंटमध्ये ८० टक्क्यांची वाढ title=

नवी दिल्ली : गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदी लागू झाल्यानंतर डिजीटल पेमेंटमध्ये आधीच्या तुलनेत ८० टक्क्यांची वाढ झालीये. अधिकृत आकड्यांनुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अखेरपर्यंत डिजिटल देवाण-घेवाणीत साधारण १८०० कोटी रुपयांपर्यंतची  वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

जून, जुलै आणि ऑगस्टच्या ट्रेंडवर नजर टाकली असता या महिन्यांमध्ये साधारण १३६-१३८ कोटी रुपयांचे डिजिटल ट्रान्झॅक्शन झाले. द टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या ट्रेंडनुसार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीसपर्यंत १८०० कोटी रुपयांच्या ट्रान्झॅक्शनची अपेक्षा आहे. 

डिजीटल ट्रान्झॅक्शनमध्ये UPI-BHIM, IMPS, M-wallet,डेबिट कार्ड तसेच इतर सर्व डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन हे व्यवहार करण्यात आलेत. विशेष म्हणजे ८ नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होतंय. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी नोटाबंदी फसल्याचे सांगत हा दिवस काळा दिवस साजरा करण्याची घोषणा केलीये. तर दुसरीकडे सरकार ८ नोव्हेंबरला काळा पैसा मुक्त दिवस म्हणून साजरा करणार आहे.