कर्नाटकात सत्तेत सोबत असणाऱ्या जेडीएसचा काँग्रेसला मोठा झटका

काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Updated: Jun 29, 2018, 08:09 PM IST
कर्नाटकात सत्तेत सोबत असणाऱ्या जेडीएसचा काँग्रेसला मोठा झटका title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आताच जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार बनलं आहे. पण सरकार बनल्यापासून काँग्रेस आणि जेडीएसची युती किती दिवस टिकणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेस नेते सिद्दारमैया यांनी म्हटलं होतं की, कर्नाटकमधील हे सरकार 1 वर्षापेक्षा अधिक टिकणार नाही. कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण गरम असतांनाच आता जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस सरकारच्या शपथविधीला मंचावर अनेक पक्षाचे नेते एकत्र दिसले होते. भाजप विरोधी हे सर्व पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करतील अशी चर्चा तेव्हा सुरु झाली होती. पण आता देवीगौडा यांनी यावर आणखी एक वर्तव्य केलं आहे.

एचडी देवेगौडा यांनी महाआघाडीबाबत वक्तव्य केलं की, 'आवश्य़क नाही के जी पक्ष कुमारस्वामीच्या शपथविधीला एकत्र आले होते ते सर्व पक्ष काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवतील.' पण तिसऱ्या आघाडीची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यामुळे आता काँग्रेसला झटका लागणार आहे. कारण जर तिसऱी आघाडी निवडणुकीच्या मैदानात आली तर याचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे.

देवेगौडा यांनी म्हटलं की, 'यूपीमध्ये सपा आणि बसपा यांच्यात जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि आमच्यामध्ये समस्या आहे. पण आम्ही आता एकत्र आहोत.' पण सिद्दरमैया यांच्या वक्तव्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया नाही दिली.

एचडी देवेगौडा यांनी पुढे म्हटलं की, कर्नाटकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि जेडीएसमध्ये युतीची चर्चा आहे. लोकसभेत काँग्रेस 18 आणि जेडीएस 10 जागांवर निवडणूक लढवेल अशी देखील चर्चा आहे पण आताच त्यावर बोलणं चुकीचं ठरेल. अजून काहीही ठरलेलं नाही. याआधी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देखील महाआघाडीमध्ये काँग्रेस आणि राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.