बंगळुरु : जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी सोमवारी युपीएला जर बहुमत मिळालं तर त्यांची पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती असेल याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना पंतप्रधानपदासाठी विरोधकांची पसंती मिळू शकते. देश तेलगु देशम पक्षाचे अध्यक्षांकडे नेतृत्व म्हणून पाहत आहे. देवगौडा यांनी म्हटलं की, 'देशात सध्या स्थिती गंभीर आहे. तेव्हा नायडू यांनी हे आव्हान घेतलं आहे. ते देशाचे पंतप्रधान का बनणार नाहीत.'
तिरूवुरु आणि पमारूमध्ये तेलुगु देशम पक्षाच्या समर्थनात देवेगौडा यांनी दोन सभा घेतल्या. राज्यात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी तिरूवुरूमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना माननिय पंतप्रधान म्हणून संबोधलं. त्यानंतर भविष्यातील पंतप्रधान असं देखील म्हटलं. त्यावर नायडू यांनी म्हटलं की, मी कोणत्याही पदासाठी इच्छूक नाही.
याआधी माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष देवेगौडा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा आरोप केला होता. 'पीएम मोदी यांना भारताला हिंदु राष्ट्र बनवायचा आहे. देशाच्या १३० कोटी जनतेला हे मान्य असेल तर त्य़ाची परीक्षा या निवडणुकीत होईल.'