#Kiki_Challengeचा देसी तडका, थेट शेतात औतामागे (व्हिडिओ)

पोलिसांनी हा ट्रेण्ड (Kiki Challenge) फॉलो करणे अत्यंत धोक्याचे असल्याचे केव्हाच सांगीतले आहे.

Updated: Aug 4, 2018, 12:54 PM IST
#Kiki_Challengeचा देसी तडका, थेट शेतात औतामागे (व्हिडिओ) title=

मुंबई: Kiki Challenge चॅलेंजने सध्या विदेशात जोरदार धुमाकूळ घातला आहे. पण, हे लोन आता भारतातही आले असून, तरूणाई Kiki Challengeचा ट्रेण्ड फॉलो करताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ चालत्या गाडीतून उतरून रस्त्यावर डान्स करणारी मंडळी तुम्ही पाहिली असतील. पण, धक्कादायक असे की Kiki Challengeचे हे प्रस्त आता थेट शेताच्या बांधावर आणि थेट शेतातही पोहोचले आहे.

पोलिसांनी हा ट्रेण्ड (Kiki Challenge) फॉलो करणे अत्यंत धोक्याचे असल्याचे केव्हाच सांगीतले आहे. पण, तरीही विदेशातील हा ट्रेण्ड भारतातील शहरे आणि गावातही फॉलो केला जाताना दिसतो आहे. विशेष असे की, Kiki Challengeचा हा ट्रेण्ड भारतीय आपापल्या पद्धतीने घेत आहेत. काही लोक बैलगाडीसोत Kiki Challenge स्वीकारतायत तर, काही लोक आपल्या इतर पद्धतीने. धक्का तर तेव्हा बसला जेव्हा हा ट्रेण्ड थेट शेतात औतामागे चिखलात फॉलो केला गेला...