एका बाईकवर दहा लोकांनी कसं बसावं? पठ्ठ्यानं सांगितली ट्रीक! देसी जुगाडाचा VIDEO VIRAL

Viral Desi Jugaad Bike: सोशल मीडियावर जुगाडाचे व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल (Viral Video on Instagram) होताना दिसतात त्यातून तुम्हालाही या व्हिडीओमधून काहीतरी शिकता येते अथवा काही गोष्टी तर आपल्याला फारच नव्यानं कळतं असतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये (Man with 10 Children on one Bike) चक्क एक माणूस दहा मुलांना घेऊन एकाच बाईकवर बसताना दिसतो आहे. 

Updated: Apr 24, 2023, 09:11 PM IST
एका बाईकवर दहा लोकांनी कसं बसावं? पठ्ठ्यानं सांगितली ट्रीक! देसी जुगाडाचा VIDEO VIRAL  title=
@ jass__u.s.a / Instagram

Viral Desi Jugaad Bike: आपल्याकडे जुगाड एक नाही तर दहा प्रकारे करू शकतो. त्यामुळे अशा तऱ्हेच्या जुगाडाचा व्हिडीओ (Viral Video of Desi Jugaad) हा अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होयला लागतो. त्यातून तुम्हाला माहितीये का की एका बाईकवर दहा जणांनी कसं बसावं याचं ट्रेनिंग... नाही नाही तर जुगाडाचा व्हिडी सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. या व्हिडीओमध्ये चक्का एका बाईकवर दहा जणं बसण्याची (Bike Viral Video) धडपड करताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी एक खिल्ली उडवली आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. चला तर पाहूया की नक्की या पठ्ठानं असं केलंय तरी काय? 

आपल्या कुठे फिरायला जायचं म्हटलं की एक गाडी नाहीतर बाईक लागतेच. जर का आपल्याकडे अशाप्रकारे एक खाजगी वाहन असेल तर आपण कुठेही सहज जाऊ शकतो. परंतु एका व्यक्तीनं तर आपल्या संपुर्ण कुटुंबाला एकत्र एका बाईकवर कसं घेऊन जाता येईल याची धडपड करताना दिसतो आहे. यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. तुम्ही या व्हिडीओ पाहू शकता की एक इसम दहा मुलांना सह स्वत: एकाच बाईकवर बसण्याची धडपड करतो आहे. सध्या यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. (desi jugaad goes viral a man trying to sit with ten others on one bike netizens make fun of it)

देसी जुगाड असाही! 

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक माणूस दहा जणांना एकाच बाईकवर बसवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यातील थोडी मुलं ही पुढच्या बाजूला बसली आहेत तर थोडी मुलं ही मागच्या बाजूला बसली आहेत आणि हा माणूस मधल्या भागी बसला आहे त्यातून ही मुलं त्या बाईकवर बसण्यासाठी धडपडत आहेत. एवढ्यातच मागच्या बाजूनं मुलं काठी आणतात आणि मग त्यावर बसतात त्यामुळे हे देसी जुगाड सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली! 

हा व्हिडीओ @jass__u.s.a  या यूझरनं पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 2 लाख 30 हजार लोकांनी पाहिला आहे. यावर लोकं ही नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युझरनं म्हटलंय की अजून दोन लोकं बसवा म्हणजे तुमची क्रिकेट टीम पुर्ण होईल तर एकानं असं म्हटलंय की, यामुळेच दर देश बरबाद आहे.