नवी दिल्ली : ही बातमी तुमच्या कामाची...येत्या काही दिवसात मोबाईल नंबर न बदलता जसा सर्व्हिस प्रोव्हायडर बदलता येतो...तसाच बँक अकाऊंट नंबर न बदलता तुम्हाला बँक बदलता येणार आहे.
रिझर्व्ह बँकेनं बँक अकाऊंट पोर्टेबिलिटीची चाचपणी करण्याचे निर्देश सर्व बँकाँना देण्यात आलेत. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी याविषयीची माहिती दिलीय.
गेल्या काही दिवसात बँकां सेवांविषयी ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. तर दुसरीकडे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात मात्र वाढ होतेय. सेवांचा दर्ज न सुधारता शुल्क आकरण्यात येत असेल तर ग्राहक त्या बँकां बदलण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे...त्यासाठी बँक अकाऊंट पोर्टेबिलीटीची सुविधा सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
यूपीआय आणि आधारच्या जमान्यात बँक अकाऊंट पोर्टेबिलीटी सहज शक्य आहे, असंही डेप्युटी गव्हर्नरनी स्पष्ट केलंय. बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमात एस एस मुद्रा बोलत होते.