Rs 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लोकं आपल्याकडील दोन हजाराची नोट बँकेत बदलू शकतात किंवा जमा करु शकतात. पण यानंतरही लोकांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. आपल्याडचो दोन हजाराची नोट संपवण्यासाठी लोकं जुगाड करताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर त्याचे साईड इफेक्टही (Side Effect) दिसू लागले आहेत.
लोकांचा जुगाड
आपल्याकडील 2 हजार रुपयांची नोट संपवण्यासाठी आता काही जणांनी नवा जुगाड शोधला आहे. लोकं ऑनलाईन (Online) सामान मागवत असून यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा (Cash On Delivery) पर्याय निवडत असल्याचं समोर आलं आहे. सामान आल्यानंतर डिलिव्हरी बॉयच्या (Delivery Boy) हातात दोन हजाराची नोट ठेवली जात असल्याचं समोर आलं आहे. ऑनालाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो (Zomato) या कंपनीने याचा खुलासा केला आहे. झोमॅटोने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी म्हटलंय 2 हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळपास 72 टक्के ऑर्डर या कॅश ऑन डिलिव्हरीच्या आल्या आहेत.
since friday, 72% of our cash on delivery orders were paid in ₹2000 notes pic.twitter.com/jO6a4F2iI7
— zomato (@zomato) May 22, 2023
गर्दी करण्याची गरज नाही
लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन आबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी केलं आहे. 2 हजारची नोट बदलण्यासाठी बँकेत गर्दी करण्याची गरज नाही नोट बदलण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा अवधी आहे असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. चलनातून बाद झालेल्या नोटांची भरपाई करण्यासाठी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या, हा उद्देश पूर्ण झाला आहे, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. नोट जमा करण्याची प्रक्रिया 23 मे पासू सुरु होणार आहे. 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी ओळखपत्राची गरज नसल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. एका वेळी 2 हजारांच्या 10 नोटा बदलता येणार आहेत.
पेट्रोलपंपावर 2 हजारांच्या नोटा घेऊन नागरिकांनी गर्दी
2 हजारच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा आरबीआयनं केली, त्यानंतर पेट्रोलपंपावर 2 हजारांच्या नोटा घेऊन नागरिकांनी गर्दी केली. अनेक ठिकाणी पेट्रोलपंपावर इंधन भरुन लोकं दोन हजारांच्या नोटा दिसत आहेत. बँकांमध्ये जाऊन बदली करण्यापेक्षा काही खरेदी करुन 2 हजारांच्या नोटा देण्यावर नागरिकांचा भर आहे. दुसरीकडे सगळेच दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन आल्यामुळे सुट्टे पैसे परत देण्यासाठी पेट्रोलपंप चालकांची मात्र तारांबळ उडताना दिसत आहे.