Supreme Court Verdict on Demonetisation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने (Central Government) 8 नोव्हेंबर 2016 रोजी केलेल्या नोटबंदीच्या (Notebandi) निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सोमवारी (2 जानेवारी) महत्त्वाचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने नोटंबदीविरोधात केलेल्या सर्व 58 याचिका फेटाळून लावल्या. मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. 2016 साली केंद्र सरकारने 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंदीचा अचानक निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर एका रात्रीतून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 10 लाख कोटी रुपये चलनातून बाद करण्यात आले होते.
रिझव्र्ह बँक आणि सरकार यांच्यात सुमारे 6 महिने याविषयी चर्चा सुरु होती, याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली होती. या निर्णयामध्ये RBI कायद्याच्या कलम 26(2) चे पूर्णपणे पालन करण्यात आलं आहे. ( Demonetisation big decision by supreme court know the 8 facts of it )