Bikini Girl Metro : मेट्रोतील बिकिनी गर्लचा नवीन Video Viral, बोल्ड ड्रेस घालून केलं असं काही की...

Metro Girl Rhythm Chanana New Video : दिल्ली मेट्रोमधून बिकिनी घालून एका तरुणीने प्रवास केला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दिल्ली मेट्रोतील ती तरुण कोण आहे. अगदी तिची तुलना उर्फी जावेदशी केली. त्यानंतर दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro Viral Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता त्या बिकिनी गर्लचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Apr 8, 2023, 02:58 PM IST
Bikini Girl Metro :  मेट्रोतील बिकिनी गर्लचा नवीन Video Viral, बोल्ड ड्रेस घालून केलं असं काही की... title=
delhi metro girl rhythm chanana hot and Bold new video on Social media trending google trends

Viral Delhi Metro Girl : ती दिल्ली मेट्रोमधून प्रवास करत होती...जेव्हा स्टेशन आलं ती जागेवरून उठली तर तिला पाहून प्रवाशांना घाम फुटला. कारण तिने घातलेले कपडे...म्हणजे ती फक्त बिकिनी आणि शॉर्ट स्कर्ट घालून आली होती. अशाप्रकारे कमी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी प्रवास करण्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. त्यानंतर #DelhiMetro ट्रेंडिंगमध्ये आला. दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ समोर आले. (Delhi Metro Girl)

दिल्ली मेट्रोमधील ही व्हायरल मुलगी कोण आहे, तीने असं का केलं तिचे घरचे काही म्हणत नाही का? अगदी दिल्ली मेट्रो (DMRC) ने या तरुणांवर कारवाई करावी अशा अनेक गोष्टींनी वाद पेटला. या तरुणीचं नाव ऋदम चनाना (Rhythm Chanana) असं आहे. इन्स्टाग्रामवर ती खूप सक्रीय असते. तिचा प्रोफाईल बघितल्यास हे लक्षात येतं की, सर्वातीला पारंपरिक वेशात ती फोटो आणि व्हिडीओ टाकत होती. पण नंतर तिचं रुपचं पालटलं...( delhi metro girl rhythm chanana hot and Bold new video on Social media trending google trends)

तिच्या त्या एका व्हिडीओनंतर ती सोशल मीडियामध्ये टीकेमुळे असो पण फ्रेमस झाली. त्यानंतर तिनेही पुन्हा एक व्हिडीओ शेअर केला आणि मग...

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील आलिया भट्टच्या 'मेरी जान' गाण्यावर ऋदम चनानाने डान्स केला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. तिचा हाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेक यूजर्सला तिचा हा डान्स व्हिडीओ आवडला आहे. 

या डान्ससाठीही तिने बोल्ड आणि शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या एका घटनेनंतर तिचा इंस्टाग्रामवर 30 हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. सध्या ती सोशल मीडिया सेलिब्रेटी झाली आहे. सगळीकडे तिचीच चर्चा सुरु आहे. 

19 वर्षीय तरुणी ठिकठिकाणी मुलाखत देताना दिसतं आहे. तिने असं कपडे का घातले असं तिला विचारल्यावर ती म्हणाली की, तिने हे प्रसिद्ध होण्यासाठी नाही केलं. तिला आवडतं असे कपडे घ्यायला. तिला असंही विचारण्यात आलं की, असं कपडे घ्यालायला तुला भीती वाटतं नाही का? विनयभंगाची भीती वाटत नाही का? त्यावर तिने स्पष्टपणे सांगितलं मला असे कपडे घ्यालायला भीती वाटतं नाही, आणि मी अशा लोकांनाकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे.