नवी दिल्ली : दिल्लीचे केजरीवाल सरकार गायींसाठी वृद्धाश्रम सुरू करणार आहे. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार या वृद्धाश्रमात गायीच्या खाण्यापिण्यापासून संभाळ करण्याच्या सर्व सुविधा असणार आहेत. आता हे वृद्धाश्रम कसे चालणार ? कोण याची जबाबदारी घेणार ? याची रुपरेषा एनीमल हसबेंडरी विभागाचे अधिकारी लवकरच संबंधित विभागांशी बोलून ठरवणार आहेत.
घुम्मन हेडा गावामध्ये 18 एकर जमीनीवर गोशाळेसोबत वृद्धाश्रम बनवून बुजुर्ग गायींची सेवा केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 2 ते 3 ठिकाणी गोशाळा बनवली जाणार आहे. सर्व 272 वॉर्ड्समध्ये पशु रुग्णालय खोलण्यात येणार आहेत. 16 जानेवारीला तीस हजारी येथे पायलेट प्रोजेक्ट म्हणून हॉस्पीटल सुरू केले जाणार आहे. घुम्मन हेडा गावात 18 एकर जमिनीवर गोशाळेसोबतच वृद्धाश्रम बनवले जाणार आहे. या वृद्धाश्रमासाठी गाईच्या मालकाला एक निश्चिक रक्कम द्यावी लागणार आहे.
यासोबतच बेसहारा प्राण्यांसोबतच पाळीव प्राण्यांनाही मायक्रोचीप लावण्याच्या विचारात आहे. दिल्लीमध्ये पशुपक्षांसंदर्भात कोणती निति नसल्याचे मंत्री गोपाल राय सांगतात. दिल्लीमध्ये उघड्यावर फिरणाऱ्या बेसहारा प्राण्यांची संख्या खूपच चिंताजनक आहे. हे पाहता पाळीव प्राण्यांनाही मायक्रोचीप लावण्याचा विचार सुरू आहे. चीप लावल्यानंतर उघड्यावर फिरणारे जनावर कोणाचे आहे याचा शोध लावून मालकावर कारवाई करण्यात येणार आहे.