पावसामुळे दिल्लीच्या हवेत गारवा

राजधानी दिल्लीतलं वातावरण अचानक पालटलं आहे. दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय.

Updated: Nov 18, 2017, 04:59 PM IST
पावसामुळे दिल्लीच्या हवेत गारवा  title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतलं वातावरण अचानक पालटलं आहे. दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय.

नागरिक हैराण 

एकीकडे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच दुसरीकडे दिल्लीतील नागरिकांना प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील वायु प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. 

प्रदूषणापासून दिलासा 

आता पावसामुळे दिल्लीवासियांना प्रदूषणापासून दिलासा मिळालाय. पहाटेच्या सुमारास पाऊस झाला असला तरी सकाळी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळालं.