नवी दिल्ली : दिल्लीतील एका नागरीकाने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांना मास्क घालण्याचा सल्ला दिला.
डेटा वैज्ञानिक अमृत शर्मा यांनी ओबामांना पत्र लिहून हे सुचित केले आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाकडे लक्ष वेधले जाईल, त्याबद्दल जागरुकता निर्माण होईल आणि त्यावर तोडगा काढण्यास अनेकजण प्रेरीत होतील. असा हा प्रत्रामागील हेतू आहे.
दिल्लीतील वायु प्रदूषणाने गेल्या काही दिवसात हाहाकार माजवला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डने आज वायु गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) ३६० दाखल केला आहे. ओबामांसोबतच्या संवाद सत्रात अमृत शर्मा यांना देखील आमंत्रित केले आहे.
टाऊन हॉलमध्ये होणाऱ्या या बैठकीत बराक ओबामा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता आहे. या बैठकीत बराक ओबामा देशातील विभिन्न भागातील सुमारे ३०० युवा नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
यापुर्वी ओबामा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये भेट घेतली. यात उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील वाढता वाद, बेलिस्टिक मिसाईलचे प्रक्षेपण यामुळे वाढणारा तणाव यावर चर्चा केली. या चर्चेत शी जिनपिंग यांनी चीन आणि अमेरिकेचे चांगले संबंध जगभरात शांती, स्थिरता त्याचबरोबर वैश्विक विकास आणि आनंद टिकवण्यासाठी, वाढण्यासाठी महत्त्वपुर्ण आहेत. ती आपली जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.