३ दिवसांपासून बेपत्ता होता तरुण, फ्रिजमध्ये आढळले शरीराचे तुकडे

 धक्कादायक म्हणजे मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 15, 2017, 04:45 PM IST
३ दिवसांपासून बेपत्ता होता तरुण, फ्रिजमध्ये आढळले शरीराचे तुकडे title=
Representative Image

नवी दिल्ली : दिल्लीतील महरौली परिसरात शनिवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्ती हा गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता.

मृत व्यक्तीची ओळख विपिन जोशी अशी झाली असून तो २९ वर्षांचा होता. विपिन हा १० ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. विपिनचा मृतदेह त्याचाच एक सहकारी बादल मंडल याच्या घरात आढळला.

मृतक विपिन जोशी आणि बादल हे दोघेही दक्षिण दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये बारटेंडर म्हणून काम करत होते. या घटनेनंतर बादल फरार झाला आहे.

मृतक विपिनच्या एका नातेवाईकाने आरोप केला आहे की, विपिनची हत्या ही मैत्रिमुळेच झाली आहे. मला पूर्ण खात्री आहे की त्याच्या मित्रानेच विपिनची हत्या केली आहे. नाहीतर तो फरार का झाला असता?

पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. तसेच मृतक विपिनचा मित्र बादल याचाही शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक व्यक्ती हा उत्तराखंडचा राहणारा आहे. तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. त्याच्या भावाने काही दिवसांपूर्वीच तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तो तिन दिवसांपासून बेपत्ता होता.

मृतक विपिनच्या भावाने त्याच्या मित्रावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी थेट बादलच्या घराची झडती घेतली आणि त्याच्या घरात विपिनचा मृतदेह आढळला. विपिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.