दिल्लीत गोदामाला भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील बावना औद्योगिक परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 20, 2018, 10:03 PM IST
दिल्लीत गोदामाला भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू title=
File Photo

नवी दिल्ली : दिल्लीतील बावना औद्योगिक परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्‍निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्‍या आणि आग विझविण्याचे काम सुरु केलं.

दिल्ली अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

बवाना परिसरात असलेल्या प्लॅस्‍टिक कारखान्यांना ही भीषण आग लागली होती. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती आणि ७ वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं.