पराठा खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

 विवान असे त्या बालकाचे नाव असून तो दिल्लीतील रणहौला परिसरातल्या विकास नगरमध्ये राहत होता.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 16, 2017, 04:24 PM IST
पराठा खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू title=

दिल्ली : पराठा खाणे दीड वर्षाच्या चिमुरड्याच्या जिवावर बेतल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दिल्लीत घडली आहे. विवान असे त्या बालकाचे नाव असून तो दिल्लीतील रणहौला परिसरातल्या विकास नगरमध्ये राहत होता. डॉक्टरांनी उपचार करण्याआधीच विवानचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी दीड वर्षाच्या विवानचा घरात संशयास्पदरित्यारीत्या मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. घरातल्यांनी लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथून त्याला दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. मुलाची वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात येत होते.  डॉक्टरांनी तपासाननंतर त्याला मृत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर पराठ्याचा एक तुकडा विवानच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. 

आईने बनवला पराठा

आईनेच विवानसाठी प्रेमापोटी पराठा तयार केला होता. खात असताना पराठ्याचा एक तुकडा घशात अडकल्याने विवानला अन्न गिळणे तसेच श्वास घेणे कठीण झाले. त्यामुळे थोड्याच वेळात विवान बेशुद्ध पडला.