राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पगारवाढीमुळं दोन आठवड्यांआधीच दिवाळी

त्यांच्या पगारवाढीचा केंद्राच्या तिजोरीवर किती बोजा? एकदा आकडा पाहाच... 

Updated: Oct 8, 2022, 10:49 AM IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पगारवाढीमुळं दोन आठवड्यांआधीच दिवाळी  title=
dearness allowance DA Hike Delhi Government 7th pay commission

DA Hike : दिवाळीचे (Diwali 2022) दिवस जसजसे जवळ येतात तसतसं नोकरदार वर्गाला उत्सुकता लागते ती म्हणजे मिळणाऱ्या वाढीव पगाराची, अर्थात बोनसची (Diwali Bonus). दिवाळीच्या दिवसांपूर्वी हातात येणारी ही रक्कम नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देऊन जाते. त्यातच आता पगारवाढीला आणखी एका भत्त्याची जोड मिळाली आहे. त्यामुळं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही खास दिवाळी भेट पाहता, जी मंडळी खासगी क्षेत्रात नोकरी करतात ती आता सरकारी क्षेत्रातील (Government jobs) नोकरीचा शोध घेणार असं म्हणायला हरकत नाही. 

दिवाळीच्या आधी राज्यसरकारी कर्मचाऱ्यांची चांदी झालीये खरी, पण ती महाराष्ट्रात नाही, तर दिल्लीत. दिल्ली सरकारच्या (Delhi Government) बैठकीत डीए (DA) म्हणजेच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्त्वाखाली एका समितीनं हा निर्णय घेतला. 

सरकारी आदेश जारी... 
राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही खास दिवाळी भेट देण्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला. या अधिकृत आदेशानुसार केंद्राकडून निर्धारित दरांनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवला. 

केंद्रानं मागच्याच महिन्यात घेतला होता निर्णय 
मागच्या महिन्यात 28 सप्टेंबर रोजी केंद्रात कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी कर्मचारी आणि पेंशनर्सच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन लाभार्थी 1 जुलै 2022 पासून डीए आणि डीआरच्या वाढीव रकमेचे हक्कदार असतील असं सांगितलं. सदर तरतुदीमुळं केंद्राच्या तिजोरीवर 12,852 कोटी रुपयांचा अधिक भार पडणार आहे.