भारतातील 6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला; लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले

Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे. 

Updated: Dec 8, 2022, 07:12 PM IST
भारतातील  6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला;  लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले title=

Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे. त्यामुळे आपण काय आणि कशी खबरदारी घेऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं ठरलं आहे. अशा घटनांमुळे सध्या सगळ्यांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक धक्कादायक घटना सध्या घडली आहे. त्यामुळे सध्या आपल्या सर्वांनाच सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. (Data theft of 6 lakh Indians information from fingerprint to login sold in bot markets says a report)

भारतातील सुमारे 6 लाख वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे आणि तो बॉट मार्केटमध्ये विकला गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या डेटामध्ये फिंगरप्रिंटपासून लॉगिन पासवर्डपर्यंतची माहिती समाविष्ट आहे. जगातील सर्वात मोठ्या VPN सेवा प्रदात्यांपैकी एक NordVPN नं याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार आतापर्यंत जगभरातील सुमारे 50 लाख लोकांचा डेटा चोरीला गेला आहे आणि तो बॉट मार्केटद्वारे विकला जात आहे.

NordVPN ने आपल्या अभ्यासात म्हटले आहे की चोरी झालेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांचे लॉगिन, कुकीज, डिजिटल फिंगरप्रिंट, स्क्रीनशॉट आणि इतर वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे. एखाद्या व्यक्तीच्या डेटा आणि वैयक्तिक माहितीची किंमत 490 रुपये आहे. NordVPN ने आपल्या अभ्यासात दावा केला आहे की जगभरातील सुमारे 5 दशलक्ष लोकांना डेटा चोरीचा फटका बसला आहे त्यापैकी बहुतांश भारतीयांचा डेटा चोरीला गेला आहे. भारतातून सुमारे 6,00,000 लोकांचा डेटा चोरीला गेला आहे जो बॉट मार्केटमध्ये विकला गेला आहे. 

भारतात आता सातत्याने सायबर हल्ल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अलीकडेच दिल्ली एम्सच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (ICMR) च्या वेबसाइटवर सायबर हल्ला झाला. इतकेच नाही तर अलीकडेच हॅकर्सनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडलही हॅक केले होते.