स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून दार्जिंलिंगमध्ये तणाव

दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र राज्याच्या मागणीवरुन तणाव कायम आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानं पुकारलेल्या बंदचा आज दुसरा दिवस आहे. बंद दरम्यान जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी जवान आणि आंदोलक आमनेसामने येतायेत. 

Updated: Jun 13, 2017, 09:49 PM IST
स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून दार्जिंलिंगमध्ये तणाव title=

दार्जिलिंग : दार्जिलिंगमध्ये स्वतंत्र राज्याच्या मागणीवरुन तणाव कायम आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानं पुकारलेल्या बंदचा आज दुसरा दिवस आहे. बंद दरम्यान जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी जवान आणि आंदोलक आमनेसामने येतायेत.

दार्जिलींगच्या अनेक भागात लष्कर आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. सरकारी कार्यालयांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलीये. दार्जिंलिंगमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र राज्याची मागणी आहे. या मागणीनं पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळं ममता सरकारची डोकेदुखी वाढलीये.

पश्चिम बंगाल सरकारनं गोरखा जनमुक्ती मोर्चा विरोधात कडक भूमिका घेतलीये. हिंसा अजीबात मान्य नसल्याचं आणि कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलाय.