नवी दिल्ली : सलग तीन आठवड्यांनंतर पेट्रोल डिझेलचे दर स्थिरावले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होवून देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत होती. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी तब्बल २१ दिवसांनंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये डिझेल प्रतिलिटर ११.०१ रुपयांनी महाग झाला आहे, तर पेट्रोलच्या किंमतीत ९.१२ रुपयांनी वाढ झाली आहे.
Delhi: No increase in prices of petrol & diesel in the national capital today. Petrol at Rs 80.38/litre & diesel at Rs 80.40/litre. pic.twitter.com/dBRTAUOnRW
— ANI (@ANI) June 28, 2020
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील अनुक्रमे पेट्रोलचे दर कोणत्याही प्रकारचे बदल न करता ८०.३८ रूपये, ८२.५ रूपये, ८७.१४ रूपये आणि ८३.५९ रूपयांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे डिझेलचे दर अनुक्रमे ८०.४० रूपये, ७५.५२ रूपये, ७८.७१ रूपये आणि ७७.६१ रूपये प्रती लिटर आहेत.
रोज बदलणारे पेट्रोल डिझेलचे दर तुम्ही एका SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेवू शकता. इंडियन ऑयलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू शक