सावधान...Loan घेत असाल तर थांबा; सायबर पोलिसांनी दिला 'हा' इशारा

ऑनलाईन लोन (Online loan) अँपच्या माध्यमातून मोबाईलवर काही मिनिटात इझी लोन घेण्यासाठी अनेकांचा कल वाढत चाललंय. पण कर्ज सहज मिळत असलं तरी नंतर मात्र कर्ज फेडून त्यापासून मुक्त होणं कठीण होऊ बसलं आहेय. 

Updated: Oct 12, 2022, 03:54 PM IST
सावधान...Loan घेत असाल तर थांबा; सायबर पोलिसांनी दिला 'हा' इशारा title=

पराग ढोबळे : ऑनलाईन लोन (Online loan) अँपच्या माध्यमातून मोबाईलवर काही मिनिटात इझी लोन घेण्यासाठी अनेकांचा कल वाढत चाललंय. पण कर्ज सहज मिळत असलं तरी नंतर मात्र कर्ज फेडून त्यापासून मुक्त होणं कठीण होऊ बसलं आहेय. कारण हे इझी लोन घेतांना मोबाईल अँपच्या परमिशनमुळं तुमचा संवेदनशील डेटा वापरून अधिक पैसे उकळण्यासाठी गोरखधंदा चालवला जात आहे. याच पध्दतीनं 70 पेक्षा अधिक तक्रारी नागपूर सायबर विभागाकडं आलेल्या आहेय. त्यामुळे इझी लोन नंतर मात्र डोकं दुःखी ठरत असल्यानं यापासून दूरच राहण्याचा सल्ला सायबर पोलिसांकडून दिला जातोय.

काय आहे नेमकं प्रकरण....

कोव्हिडंच्या काळात अनेक जण आर्थिक अडचणीत सापडेलत. घरात राहून काम धंदा नसल्याने दैनंदिन कामासाठी लागणार पैसा उधार पाधार घेऊन काहींनी वेळ मारून नेलीय. पण काही जण यांमध्ये खासकरून छोटे व्यावसायिक आणि कॉलेजच तरुण मंडळी ऑनलाईन लोन वाटप कंपन्यांचा जाळ्यात अडकल्या गेलेत. 5 ते  10 हजार रुपयांचं लोन विना कागदपत्रांनं सहज मिळत असल्याचा बनवा केला. याचा पध्दतीनं आमिष देत ऑनलाईन अपलिकेशन डाउनलोड करण्याचा सल्ला दिला गेला. गरज वंतांनी काहीही विचार न करता लोन अप्लिकेशन मोबाईलमध्ये इंस्टॉल केलं. नेमकी इथंच चूक झाली. मोबाईल अँप कुठल्या गोष्टींची परवानगी मागतय याची कुठलीच शहानिशा न करता संपूर्ण मोबाईलचा ताबा लोन अँप कंपन्यांना देऊन टाकला. 

बदनामीची भीती दाखवत घेतले पैसे...

यातच अनेकांनी कर्ज घेतलं काहींनी अडचण सुटताच लोन परत दिलं. पण परत देऊनही त्यांना अधिक पैश्याची मागणी झाली. काहींनी पैसेही दिलेत. पण काहींना फोटो मॉर्फ करून धमकवण्यात आलंय. त्यात मोबाईलमधील असलेल्या मोबाईल धारकांना अधिक पैसे द्या नाही तर बदनामी करण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार सायबर पोलिसांकडे आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी झी मिडियाशी बोलतांना सांगितलं. 

वाचा : 'या' कारणांमुळे कमी वयात तुटू लागतात शरीरातील हाडे, हाडे मजबूत बनवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

राष्ट्रीय कृत बँकांकडूनच कर्ज घ्यावं...

त्यामुळे सहज मिळणाऱ्या लोनच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन नागपूर सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी केली. तसेच या सर्व लोन अँपवर आरबीआयकडून बंदी आहे. त्यामुळं लोन घ्यायचं झाल्यास राष्ट्रीयकृत बँकांकडून रीतसर घ्यावं. पण ऑनलाईन अँपवर निर्बंध नसल्याने त्यांच्यावर बंदी आणण्यात आली आहेय. त्यामुळं या फसव्या जाहिरातींना बळी पडू नका असा सल्ला देण्यात आलाय. तसेच अश्या पद्धतीनं कोणाची फसवणून झाली असल्यास बदनामीची भीती न ठेवता सायबर पोलिसांशी संपर्क करा असंही सांगण्यात आलय.