ड्युटीदरम्यान नमाज पठण करतानाचा हा फोटो होतोय व्हायरल

दहशतवादाशी लढणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण समोर आलेय. सोशल मीडियावर सध्या हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा फोटो व्हायरल होतोय.

Updated: Jul 30, 2017, 12:42 PM IST
ड्युटीदरम्यान नमाज पठण करतानाचा हा फोटो होतोय  व्हायरल title=

श्रीनगर : दहशतवादाशी लढणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण समोर आलेय. सोशल मीडियावर सध्या हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा फोटो व्हायरल होतोय.

या फोटोत ड्युटीदरम्यान गणवेशात एक पोलीस नमाजाचे पठण करतोय तर बाजूल सीआरपीएफ जवान उभा आहे. नमाजाचे पठण करणाऱ्या जवानाने आपल्याकडील शस्त्र बाजूला ठेवलेय. 

या फोटोला एका पत्रकाराने ट्विट करताना म्हटलंय, हा आहे खरा भारत. सीआरपीएफ नमाज पठण करणाऱ्या एका जवानाची रक्षा करतोय. या फोटोला सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही रिट्वीट करण्यात आलंय.