सीआरपीएफ जवानांकडून एक दिवसाचा पगार, ३३.८१ कोटींची सहाय्यता

 संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज 

Updated: Mar 27, 2020, 07:15 AM IST
सीआरपीएफ जवानांकडून एक दिवसाचा पगार, ३३.८१ कोटींची सहाय्यता  title=

नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज झालाय. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या निर्णयाला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. देश एका महान संकटातून जात असताना सीआरपीएफ जवानांनी मदतीचा हात पुढे केला आहे. जवानांनी आपल्या एका दिवसाच्या पगारातून जमा झालेली रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली आहे. ३३.८१ कोटी इतकी रक्कम गोळा झाली आहे. 

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांच्या सहमतीने एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीआरपीफ प्रवक्यांनी सांगितले. देशासोबत सीआरपीएफ जवान खंबीरपणे उभे असल्याचे देखील ते म्हणाले. सेवा आणि निष्ठेसहीत सीआरपीएफ सदैव तत्पर राहीलं असेही ते म्हणाले.  

गृहखात्याच्या अंतर्गत येणारी सीआरपीफ आंतरिक सुरक्षा आणि नक्षलविरोधी कारवायांशी जोडली गेली आहे. यामध्ये साधारण सव्वा तीन लाखांची कमी आहे.

देशामध्ये कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. कोरोनावर सध्यातरी ठोस उपाय सापडला नाहीयं. गेल्या २४ तासांमध्ये देशात ४३ नवे रुगण आढळले आहेत.

कॅबिनेटचा निर्णय 

राज्यांकडून जमिनीवरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना प्रभारी बनवण्यात आलं आहे. या मंत्र्यांना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून आढावा घ्यायला सांगण्यात आलं आहे. हे मंत्री गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेली नियमावली पाळण्यात अडचण तर येत नाही ना, याची माहिती घेणार आहेत. याशिवाय अडचणीमध्ये केंद्र सरकार राज्याला कशी मदत करु शकते, यावरही मंत्री लक्ष ठेवणार आहेत.

बाहेरुन किती लोकं आपल्या जिल्ह्यामध्ये परत आली आहेत. जिल्ह्यामध्ये किती जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. किती जण क्वारंटाईन आहेत, या सगळ्याची माहिती मंत्री घेतील. राज्यांची जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांना रोज पंतप्रधान कार्यालयाला व्हायरसच्या संक्रमणाविषयी आणि बचाव कार्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, राजस्थान आणि पंजाबची जबाबदारी गजेंद्रसिंह शेखावत, आसामसाठी जनरल व्हीके सिंग, उत्तर प्रदेशसाठी राजनाथ सिंग, संजीव बाल्यान, महेंद्रनाथ पांडे, कृष्णपाल गुर्जर, बिहारसाठी रवीशंकर प्रसाद आणि रामविलास पासवान, ओडिसासाठी धर्मेंद्र प्रधान, छत्तीसगडसाठी अर्जुन मुंडा, झारखंडसाठी मुख्तार अब्बास नकवी यांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे.