मुंबई : Social Media वर सध्या एक फोटो Viral होत आहे. फोटोमध्ये एक कपाट दिसत आहे. ज्यामध्ये करोडोंच्या नोटा भरलेल्या आहेत. हैदराबादमधील हेटरो फार्मास्यूटिकल ग्रुप (Hetero Pharma) वर आयकर विभागाने धाड टाकली. या दरमान विभागाने 142 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. इतकी मोठी रक्कम पाहून अधिकारी देखील हैराण झालेत.
हैदराबाद स्थित हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर नुकत्याच झालेल्या छाप्यांनंतर आयकर विभागाने 550 कोटी रुपयांचे "बेहिशेबी" उत्पन्न शोधले आणि 142 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त केले. अधिकृत सूत्रांनी शनिवारी हा दावा केला. सध्या या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 6 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने सुमारे सहा राज्यांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने एका निवेदनात म्हटले आहे, “छाप्यांदरम्यान अनेक बँक लॉकर्स सापडले, त्यापैकी 16 कार्यरत स्थितीत होते. या छाप्यांमध्ये आतापर्यंत 142.87 कोटींची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. "आतापर्यंत बेहिशेबी उत्पन्न सुमारे 550 कोटी रुपये आहे," असे म्हटले आहे.
हैदराबादस्थित हेटेरो फार्मा समूहाशी संबंधित असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. सीबीडीटीने सांगितले की, पुढील तपास सुरू आहे. सीबीडीटी आयकर विभागासाठी धोरण तयार करते. सीबीडीटीने म्हटले आहे की हा समूह फार्मास्युटिकल व्यवसायात आहे आणि बहुतेक उत्पादने अमेरिका आणि दुबई आणि काही आफ्रिकन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातात.