शिक्षकाला मुलीसोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं; बापाने मुलीसोबत जे केलं त्याने अख्खं राज्य हादरलं

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Updated: Jun 11, 2022, 07:36 PM IST
शिक्षकाला मुलीसोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं; बापाने मुलीसोबत जे केलं त्याने अख्खं राज्य हादरलं  title=

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाचं मुलीवर प्रेम जडल्याची घटना घडली होती. प्रेम तर प्रेम नको त्या अवस्थेत हा शिक्षक मुलीसोबत सापडला होता. ही घटना पाहुन संतापलेल्या बापाने मुलीसोबत असं काय केलं की संपुर्ण उत्तरप्रदेश या घटनेने हादरला.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्यात घरी शिकवणीला जाणाऱ्या एका शिक्षकाचं त्याच घरातल्या तरूणीवर प्रेम जडलं. शिकवणी करता करता दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. शिकवणी घेता घेता एके दिवशी दोघेही नको त्या अवस्थेत रूममध्ये सापडले होते. मुलीच्या बापानेच रंगेहाथ या दोघांना पकडले होते. या घटनेचा राग आल्याने वडिलांनी रागाच्या भरात मुलीची बंदुकीने हत्या करत मृतदेह घरामागील खोलीत ठेवला होता. आणि कुटूंब फरार झालं होतं. 

28 मे रोजी ही घटना उघडकीस आली होती. अल्पवयीन मुलीच्या घरातचं मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गोळी झाडून हत्या झाल्याची पुष्टी झाली होती. मृताचे नातेवाईक घटनास्थळावरून बेपत्ता होते. त्यामुळे पोलिसांना अधिकच संशय बळावला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी एसपी अभिनंदन यांनी दोन पथके तयार केली आहेत. कुटुंबीयांची कठोर चौकशी घटनेचा छडा लावला.या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन प्रियकर आणि त्याच्या वडिलांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.