किटकनाशके पिऊन बायकोने स्वतःला संपवले, घाबरलेल्या पतीने उचललं भयंकर पाऊल

Husband And Wife Suicide: एका क्षुल्लक वादातून पत्नीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही धक्कादायक पाऊल उचललं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 14, 2023, 01:04 PM IST
किटकनाशके पिऊन बायकोने स्वतःला संपवले, घाबरलेल्या पतीने उचललं भयंकर पाऊल title=
crime news Wife Commit Suicide Due To Family Dispute later husband dies in up

Crime News In Marathi: कौटुंबिक वादातून पत्नीने किटकनाशक पिऊन आत्महत्येचे पाऊल उचलले. पत्नीला मृतावस्थेत पाहून पतीच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. पत्नीने जीव संपवल्यानंतर पतीनेही धक्कादायक पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना (police) दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. शेजाऱ्यांसह दाम्पत्याच्या इतर नातेवाईकांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील (UP News) हमीरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. (Husband And Wife Suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाले होते. त्यानंतर दोघांनीही किटकनाशक पिऊन आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या घरातच दोघांचे मृतदेह पडलेले आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर हे भांडण इतके विकोपाला गेले की रागात पत्नीने किटकनाशक प्यायले. किटकनाशक प्यायल्यानंतर पत्नीचे जागीच निधन झाले. 

पत्नीचा मृत्यू होताच पती इतका घाबरला की त्यानेही किटकनाशक पिऊन आपले जीवन संपवले. थोड्याच वेळात त्याचाही मृत्यू झाले. किटकनाशक पिऊन दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी गावभर पसरली. त्यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. दोन जणांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. 

पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहलवाल समोर आल्यानंतरच नक्की काय घडलं होतं हे स्पष्ट होणार आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच, पोलिस आजूबाजूच्या रहिवाशांकडून आणि नातेवाईकांकडून आत्महत्येचं नक्की कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पोलिसांनी या बाबत माहिती देताना सांगितले आहे की, रेमेडे तरौस गावातील जोडप्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. कौटुंबीक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या आधारे पोलिस अधिक तपास करत आहेत.