एकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट

Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला. 

Updated: Dec 30, 2023, 04:18 PM IST
एकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट title=
crime news man brutally stabbed by 50 times for chatting to girl in instagram

Crime News Today: दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाने तरुणावर तब्बल 50 वेळा चाकूने वार करत त्याची हत्या केली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींनी अटक केली आहे. दिल्लीतील गोकुलपुरी परिसरात ही हादरवणारी घटना समोर आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, 20 वर्षांचा एक तरुण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका तरुणीसोबत दिवसरात्र बोलत असायचा. त्याच कारणामुळं त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. मयत तरुणाचे नाव माहिर उर्फ इमरान असल्याचे समोर आले आहे. बुधवारी भागीरथ विहार येथील रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळला होता. त्या नंतर या हत्येचा खुलासा झाला.  तर, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांचीही ओळख पटली आहे. अरमान खान, फैसल खान आणि समीर उर्फ बालू अशी आरोपींची नावं असल्याचे समोर आले आहे. त्यातील अरमान हा मुख्य आरोपी असल्याता अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरमानने बुधवारी रात्री माहिरवर तब्बल 50 वेळा चाकुने वार करत त्याची हत्या केली आहे. 

अरमान आणि माहिर यांचे एकाच मुलीसोबत अफेअर होते. अरमानला जेव्हा याबाबत कळलं तेव्हा त्याचे त्या मुलीसोबत कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा त्याला कळलं की ती मुलगी माहिरला जास्त पसंत करते. त्याचवेळी अरमानने माहिर आणि त्या मुलीला व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिले. त्या रागात त्याने तिच्याकडू फोन हिसकावून घेतला आणि फोन परत देण्याच्या बहाण्याने त्याने माहिरला एका सुनसान स्थळी बोलवले. जेव्हा माहिर आला तेव्हा आरमानने त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. 

पोलिसांनी एका महिलेच्या जबाबानुसार अरमान आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, माहिरवर निर्घृणपणे वार करण्यात आले होते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांनी चाकूही ताब्यात घेतला असून शवविच्छेदन तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईला वेग येणार आहे. मात्र, इतक्या कमी वयात प्रेमप्रकरणाच्या घटनांतून अशा घटना घडत असताना ते रोखणे पोलिसांपुढे आव्हान आहे.