दिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...

इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. त्या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती की तो अभ्यासत हुशार होता. सर्व शिक्षकांचा तो लाडका होता. या विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

राजीव कासले | Updated: May 20, 2023, 08:41 PM IST
दिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...

Crime News : इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये (Engineering College) एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण (Inhuman Beating) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण करणारे पीडित विद्यार्थ्याच्या वर्गातील मुलं होती. कॉलेजबाहेर त्याला एकट्याला गाठत जवळपास दहा ते बारा विद्यार्थ्यांनी त्याला जबर मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी आणि बेल्टने या विद्यार्थ्याला जवळपास अर्धातास मारहाण करण्यात आली. मारहाणीत हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतायत पण अजूनही धोका टळला नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 8 विद्यार्थ्यांनाविरोधात FIR दाखल केला आहे. 

काय आहे नेमकी घटना
उत्तरप्रदेशातल्या कानपूरमधल्या महाराजपूर (Maharajganj Thana Kanpur) इथं आयटी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये एजान नावाचा विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकतो.  एजाज दिसायला सुंदर आहे, अभ्यासातही तो प्रचंड हुशार असून चार दिवसापूर्वीत कॉलेजतर्फे दिला जाणारा बेस्ट स्टुंडट्स अॅवॉर्डही त्याने जिंकला होता. पण या गोष्टींमुळे त्याच्या वर्गातील इतर विद्यार्थी त्याच्यावर डूख धरुन होते. यावरुन ते एजाजला त्रासही देत होते, तसंच त्याच्यावर वाईट-साईट कमेंट करत होते. 

कँटिनमध्ये सुरु झाला वाद
शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे एजाज लेक्टर संपल्यानंतर कॉलेटच्या कॅन्टिंगमध्ये बसला होता. यावेळी त्याच्या वर्गातील काही विद्यार्थी तिथे आले आणि त्यांनी एजाजवर कमेंट पास करायला सुरुवात केली. काही वेळ एजाजने त्यांना प्रतिसाद दिलाच नाही. पण त्या विद्यार्थ्यांचा त्रास वाढत गेला, शेवटी त्रासलेल्या एजाजने त्यांना उत्तर दिलं. याचा राग त्या विद्यार्थ्यांना आला. त्या विद्यार्थ्यांनी एजाजला कॅन्टिंगमधून बाहेर नेलं आणि कॉलेजच्या समोरच त्याला अमानुष मारहाण करायला सुरुवात केली. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी एजाजला घेरून त्याला लाथा-बुक्क्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. 

तब्बल अर्धातास विद्यार्थ्यांनी एजाजला मारहाण केली. यात एजाज बेशुद्ध पडला. एजाज काहीच हालचाल करत नसल्याचं पाहातच मारहाण करणारे विद्यार्थी तिथून पळून गेले. धक्कादायक म्हणजे त्या कॉलेजचे सिक्युरिटी गार्ड घटनेच्यावेळी तिथे उपस्थित होते. पण त्यांनी एजाजला वाचवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत असा आरोप एजाजच्या कुटुंबियांनी केला आहे. 

आयसीयूमध्ये दाखल
तिथल्या काही लोकांनी एजाजला काशीराम हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. एजाजची प्रकृती खूपच गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, एजाजच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिस स्थानकात 8 विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एजाजला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x