हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...

Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.  

Updated: Jun 24, 2023, 02:31 PM IST
हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले... title=
father killed son to make physical relation with wife

Crime News : हा  बाप की हैवान असा प्रश्न पडावा, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी मुलाची हत्या केली. ती लपविण्यासाठी त्याने बनाव रचला. त्यासाठी त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नाटक रचले. दरम्यान, पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी 10 वर्षांच्या मुलाची हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील इटावा येथे घडली. आपल्या दहा वर्षांच्या निष्पाप मुलाला बापानेच विहिरीत ढकलून मारले. इटावा जिल्ह्यातील इकदिल भागातील नागला मोती गावात सावत्र बापाने हे धक्कादायक कृत्य केले. 18 जून रोजी बेपत्ता झालेल्या निष्पाप मुलाचा मृतदेह विहिरीत सापडला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता सावत्र बापच खूनी असल्याचे समोर आले.

10 वर्षांच्या मुलाच्या हत्येचा खुलासा करताना इटावा एसएसपी संजय कुमार यांनी मीडियाला माहिती सांगितली, या पीडित मुलाचे सावत्र वडील अवधेश यांनी आपल्या मुलाला विहिरीत फेकून मारले. मुलाच्या हत्येमध्ये मुलाचा सावत्र पिता अवधेश कुमारची भूमिका संशयास्पद असल्याचे शोधून पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुलाच्या हत्येची कबुली दिली आहे.

मुलाचा खुनी बाप याला पत्नीपासून आणखी एक मुल हवे होते. त्यासाठी त्याला संबंध ठेवायचे होते. मात्र, 10 वर्षांचा मुलाग आणि एक मुलगी असल्याचे सांगून पत्नी संबंध ठेवण्यास राजी नव्हती. ते नेहमी मुलांची कारणे देत असे. त्यामुळे सावत्र पित्याला 10 वर्षांच्या मुलाचा राग आला. तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले नव्हते. त्यानंतर त्याने कट रचला. पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर हैवान झालेल्या बापाने 10 वर्षांच्या मुलाला विहीरीत फेकून दिले. तो एवढ्यावर न थांबता त्याने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

मुलाला आपल्या मार्गातून काढून टाकले तर पत्नी त्याच्यापासून मुलाला जन्म देण्यास तयार होईल. 17 जून रोजी पत्नी माहेरी गेली असता दुसऱ्याच दिवशी 18 जून रोजी त्याने हा भयंकर प्रकार केला. रात्री 10 वाजता संधी मिळताच मुलाला चारा तोडण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गावाबाहेरील काही अंतरावर असलेल्या शेतात नेले आणि तेथे विहिरीत ढकलून दिले. कोवल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

मुलगा घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी मुलाचा शोध सुरु केला. तर दुसऱ्या दिवशी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगा 19 जून रोजी बेपत्ता झाल्याची माहिती हैवान बापाने पोलिसांना दिली. मुलाच्या शोधात पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. मात्र पोलिसांना यश आले नाही. स्थानिक लोकांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलाचा मृतदेह नागला मोती गावापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून बाहेर काढला.  

मुलाचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्या मृत्यूचे गूढ कुठेतरी त्याच्या घराशी जोडले जात असल्याची चर्चा गावात सुरु झाली. त्याआधारे पोलिसांनी कसून तपास सुरु केला असता ही बाब उघडकीस आली. खुनी अवधेश याचे कोर्ट मॅरेज झाले होते. अवधेशला आधीच मुलगा नाही आणि पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, त्यामुळे अवधेशने दुसऱ्या महिलेसोबत कोर्ट मॅरेज केले. अवधेशसोबत लग्न झालेल्या महिलेचे हे तिसरे लग्न आहे.