Murder of Lover : गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. या विवाहबाह्य संबंधातून अनेक धक्कादायक गुन्हे घडत आहेत. पत्नी असो पती दोघांपैकी कोणाचंही घराबाहेर अफेयर सुरु झालं की अशा अनेक घटनांचा शेवट आहे गुन्हेगारीकडे जातो. विवाहित महिलाला भेटायला तिचा प्रियकर घरी आला. नवरा घरात नाही पाहून त्या दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नियतीच्या मनात काही औरच होतं. त्यांचं हे गुपीत नवऱ्यासमोर उघड झालं. नवऱ्याने आपल्या आयुष्यभराच्या जीवनसाथीला दुसऱ्याचा बाह्यपाशात नको त्या अवस्थेत पाहिलं आणि त्याचा पायाखालची जमीनच सरकली... (Crime News extra marital affairs lover meet his girlfriend husband caught her kanpur Murder of Lover in marathi)
पती हिमाचल प्रदेशातील खाजगी कंपनीमध्ये कामावर असताना त्याचा पत्नीचं तिथल्या एका पुरुषाशी प्रेम जुळलं. त्या दोघांनी एकत्र जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना माहिती होतं की आपल्या प्रेमाचा शेवट हा वाईट होऊ शकतो. म्हणून त्यांनी एकत्र मरण्याची शपथही घेतली होती. काही दिवसांनी त्या महिलेच्या नवऱ्याला या अफेरयची भनक लागली. त्याने तातडीने बायकोला घेऊन हिमाचल प्रदेश सोडून गाव आदमपूर गाठलं.
त्यानंतरही दोघांचं प्रेम थांबल नाही. ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दिवसेंदिवस त्यांचं प्रेम वाढत होतं. शेवटी तिने नवरा घरी नाही हे पाहून प्रियकराला गुरुवारी रात्री घरी बोलवलं. अनेक दिवसांनी दोघे भेटल्यामुळे त्यांचा आनंदाला थारा नव्हता. दोघेही आनंदात असताना एकमेकांच्या मिठीत असताना अचानक नवरा तिथे आला आणि त्याने पत्नीला त्या पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं.
पत्नी आणि तिच्या प्रियकराला अशा अवस्थेत पाहून त्याचा पारा चढला आणि त्याने प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने रागाच्या भरात त्याला इतकी मारहाण केली की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे पाहून पती घाबरला आणि त्याने गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिला.
ही घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आहे. फर्रुखाबादमधून प्रियकर पंकज आदमपूरमध्ये विवाहित प्रेयसीला भेटायला आला होता. तर पतीचं नाव प्रतिपाल आहे. पोलिसांने त्याला ताब्यात घेतलं आहे. पंकज याचा मृत्यू हा विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे झाला की मारहाणीमुळे याचा तपास सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.