'हत्येसाठी संपर्क करा...' चक्क सोशल मीडियावर जाहीरात करत ही गँग घेत होती सुपारी

या गँगने Whats APP, Facebook आणि Youtube वर जाहीरत टाकली होती, इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवाला होता

Updated: Jan 13, 2023, 03:27 PM IST
'हत्येसाठी संपर्क करा...' चक्क सोशल मीडियावर जाहीरात करत ही गँग घेत होती सुपारी title=

Crime News : आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी सोशल मीडियावर (Social Media) अनेक जाहीराती (Advertisment) येत असतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवगेळ्या ऑफरही दिल्या जातात. पण कोणाची हत्या करायची आहे, तर आमच्याशी संपर्क करा अशी जाहीरात कधी पाहिली आहे का. पण चक्क Whats APP, Facebook आणि Youtube वर अशी जाहीरात झळकत होती. या गँगचं नाव आहे 'किंग्स ऑफ कालिया'. धक्कादायक म्हणजे या गँगमधील आरोपींनी किंग्स ऑफ कालिया (Kings Of Kalia) नावाने व्हॉट्सअॅप ग्रुपही (Whats App Group) बनवला होता.

किंग्स ऑफ कालिया गजाआड
'किंग्स ऑफ कालिया' या गँगने बिहारमधल्या (Bihar) पटना इथं एक सहकारी बँक लुटण्याचा प्लान आखला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आधीच सापळा रचला आणि बँक लुटण्यासाठी आलेल्या 'किंग्स ऑफ कालिया' गँगच्या सात लोकांना अटक केली. आरोपींकडून पोलिासंनी एक देशी कट्टा, दोन जीवंत काडतूसं, चोरी केलेली बाईक, सात मोबाईल आणि रोक रक्कम जप्त केली आहे. 

युट्यूबवरही ठेवलं होतं स्टेट्स
या गँगने युट्यूब चॅनलही (Youtube Channel) सुरु केलं होतं. त्याच्या स्टेट्सला हत्या करण्यासाठी संपर्क करा या जाहीरातीचा फोटो लावला होता. पोलिसांनी गुप्त महितीच्या आधारे कारवाई करत सन्‍नी कुमार, आदित्‍य कुमार, सोनू कुमार, नीतीश कुमार, दिपू कुमार, रितिक कुमार आणि मोहित कुमार यांना अटक केलं. या आरोपींकडून 7 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) राजस्थानमध्ये  (Rajasthan)धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. व्हॉट्सअॅपवरुन व्हिडिओ कॉल करत पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करण्याची घटना घडली होती. याला घाबरुन एका विद्यार्थ्याने आत्महत्याही केली होती. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थ्याकडून पैशांची मागणी करण्यात येत होती. विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानतंर त्याचा मोबाईल तपासला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

याप्रकरणाचा धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले होते. महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणी राजस्थानमधल्या भरतपूर जिल्ह्यातील सीकरी इथून दोन आरोपींना अटक केली. यापैकी एक जण 20 वर्षांचा असून त्याचं नाव सहवाज असं आहे, तर दुसरा आरोपी 44 वर्षांचा असून त्याचं नाव साहुल असं आहे. यांची मोठी टोळी असून या टोळीने देशातील जवळपास 14 राज्यातील लोकांची अशाच पद्धतीने फसवणूक केली होती.