Who is Neem Karoli Baba : विराट- अनुष्कासाठी ज्यांचे उपदेश प्रमाण, असे नीम करोली बाबा आहेत तरी कोण?

Who is Neem Karoli Baba : (Virat Kohli Anushka sharma) विराट आणि अनुष्का उत्तराखंडला वारंवार का जातात? हा प्रश्न कधी पडला असेल, तर त्याचं उत्तर आता समोर आलं आहे. जाणून घ्या एका अशा व्यक्तीविषयी ज्याच्या चेहऱ्यावरच आहे प्रचंड तेज....   

Updated: Jan 13, 2023, 12:35 PM IST
Who is Neem Karoli Baba : विराट- अनुष्कासाठी ज्यांचे उपदेश प्रमाण, असे नीम करोली बाबा आहेत तरी कोण?  title=
Neem Karoli Baba Miracles from virat kohli to Mark Zuckerberg Steve Jobs these people also followed him

Who is Neem Karoli Baba : असं म्हणतात, की आयुष्याच्या या प्रवासात एकतरी गुरू असावा. कारण, गुरूच आपल्याला संकटातून बाहेर काढतो, मनात उठलेली वादळं शांत करतो, आपल्याला सन्मार्गावर चालण्याचं बळ देतो. गुरु आपल्यासाठी जे काही करत असतो त्याविषयी आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करणंही तितकंच महत्त्वाचं. तुम्हाला माहितीये का कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही सेलिब्रिटी घ्या, त्यांना मार्गदर्शन करणारं असं कुणीतरी असतंच ज्यांच्याकडे जाऊन ही मंडळी सर्व व्यथा मांडतात. (Virat Kohli Anushka Sharma) विराट कोहली, अनुष्का शर्मा अगदी मार्क झुकरबर्ग या सर्वांच्याही आयुष्यात अशीच एक खास व्यक्ती आहे. त्यांच्या अस्तित्वानं या मंडळींच्या जीवनाला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली आहे. 

कोण आहे ही व्यक्ती? 

चेहऱ्यावर प्रचंड तेज आणि स्मितहास्याची मुद्रा असणारी ही व्यक्ती आहे, नीम करोली बाबा. हे एक आध्यात्मिक गुरु आहेत. नीम करौरी बाबा अशीची त्यांची आणखी एक ओळख. असंख्य अनुयायी त्यांना महाराज जी म्हणूनही संबोधतात. असं म्हणतात की ते हनुमानाते भक्त होते. भक्तियोगानं आराधना करून थेट भगवंताशीच संवाद साधत त्यांनी किमया केल्याची त्यांच्या भक्तांची धारणा आहे. दुसऱ्यांचीच सेवा करा, हाच संदेश त्यांनी आजीवन सर्वांना दिला. जनसेवा हीच इश्वरसेवा याच मूलमंत्राचा आधार त्यांनी इतरांना दिला. 

नीम करोली बाबांची खरी ओळख काय? (Neem Karoli baba real story)

सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार लक्ष्मण नारायण शर्मा यांच्या कुटुंबात नीम करोली बाबांचा जन्म झाला होता. पण, त्यांनी फार कमी वयातच आई- वडिलांचं घर सोडलं. पुढे वडिलांनी समजूत घातल्यानंतर ते माघारीसुद्धा आले. अखेर 1958 मध्ये ते घराबाहेर पडले ते कधीच माघारी आले नाहीत. यादरम्यान ते नीम करोली नावाच्या एका गावात आले आणि इथं त्यांनी संन्यस्त साधू म्हणून जगण्यास सुरुवात केली. नीम करोलीमध्ये त्यांनी एक आश्रम आणि हनुमानाचं मंदिरही उभारलं. 

हेसुद्धा वाचा : Virat Anushka Video: बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? ज्यांच्यासमोर कोहली-अनुष्काही नतमस्तक झाले!

 

1960 ते 70 च्या दशकात नीम करोली बाबा प्रसिद्धीझोतात आले. अनेक अमेरिकन नागरिक भारत भेटीला आले असताना त्यांनी नीम करोली बाबांची भेट घेतली आणि हे नाव जगभरात ओळखलं जाऊ लागलं. 11 सप्टेंबर 1973 रोजी नीम करोली बाबा यांचं देहावसान झालं. 

देशोदेशीचे सेलिब्रिटी या महाराज जींचे भक्त

आजवर अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत या महाराज जींच्या आश्रमाला भेट दिली आहे. (Indian Cricket team) भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्कासुद्धा या बाबांच्या आश्रमात आले होते. त्यांच्याआधी (Facebook) फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg), स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) या मंडळींनीही या आश्रमाला भेट दिली होती. 

असं सांगितलं जातं की, 2015 मध्ये ज्यावेळी झुकरबर्ग इथं पोहोचला, तेव्हा फेसबुक कठीण काळातून पुढे जात होतं. तो इथं स्टीव्ह जॉब्स यांच्याच सांगण्यावरून आला होता. असं म्हणतात की हॉलिवूडची (Hollywood Actress julia roberts) अतिशय लोकप्रिय अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स हिसुद्धा या महाराज जींच्या विचारांनी प्रभावित झाली होती, ज्यामुळं तिचं आजही भारताशी खास नातं आहे.