अहमदाबाद : गुजरातमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनीच महिलेवर अत्याचार तसेच बलात्काराचा प्रयत्न केला आहे. संतापजनक म्हणजेच पोलीस चौकीतच ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी एका विवाहित महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणलं, आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. गुजरातच्या उदयपूरमधील ही घटना असल्याची माहिती मिळत आहे.
उदयपूर पोलिसांनी एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी एका विवाहित महिलेला आणि तिच्या आईवडिलांना अटक केली होती. त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनमध्येच डांबण्यात आलं. तसेच त्यांच्याकडून अनेक कामं करून घेतली.
धक्कादायक बाब म्हणजे यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकही महिला पोलीस कर्मचारी / अधिकारी नव्हती. तरीही महिलेला पोलिसांनी बेकायदेशीररित्या डांबून ठेवले होते. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांनी महिला आणि तिच्या कुंटूंबियांना गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकामी फिरवले.
यादरम्यान पोलीस हवालदाराने महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तिच्या कुटूंबियांना वेगळ्या खोलीत ठेवून त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या कुंटूंबियांनी आरडाओरडा करीत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेबाबत गावकऱ्यांना माहिती मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन फोन करून तसेच स्टेशनमध्ये पोहचून घटनेवर आक्षेप घेतला.महिला पोलीस नसताना महिलेला रात्रभर स्टेशनमध्ये ठेवलंच कसं? असा जाब गावकऱ्यांनी विचारला. त्यानंतर बिथरलेल्या पोलिसांनी तेथून पळ काढला.
दरम्यान घटनेची चौकशी होताच सहाय्यक उपनिरिक्षक राजकुमार आणि पोलीस हवालदार जितेंद्र कुमार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.