19 वर्षाच्या मुलीने अल्पवयीन मुलावर केला लैंगिक अत्याचार; कोर्टाने दिली कठोर शिक्षा

Crime News : तरुणीने अल्पवयीन मुलाला फोन करुन माझे घरच्यांसोबत भांडण झाले आहे, तू माझ्यासोबत चल असे सांगितले होते. त्यानंतर तिने मुलासोबत गुजरातला नेले आणि एका कंपनीत कामाला लावले.

Updated: Mar 19, 2023, 04:29 PM IST
19 वर्षाच्या मुलीने अल्पवयीन मुलावर केला लैंगिक अत्याचार; कोर्टाने दिली कठोर शिक्षा title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : आतापर्यंत तुम्ही मुलांकडून मुलींवर किंवा पुरुषांकडून महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरमधून (indore) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदूर हायकोर्टाने एका प्रकरणात अल्पवयीन मुलावर अत्याचार (physical abuse) केल्याप्रकरणी एका तरुणीला शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुलीला इंदूर हायकोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपी तरुणीने फसवणूक करून या अल्पवयीन मुलाला तिच्यासोबत गुजरातला नेले होते आणि तेथे त्याच्याशी बळजबरीने अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते.

5 नोव्हेंबर 2018 रोजी एका महिलेने इंदूरमधील बाणगंगा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. महिलनेने तक्रारीत म्हटले होते की, माझा 15 वर्षांचा मुलगा 3 नोव्हेंबर 2018 रोजी खीर बनवण्यासाठी दूध घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेला होता. पण बराच वेळ होऊन गेला तरी तो घरी परतला नाही. मी नातेवाईंकांकडे त्याच्याबाबत चौकशी केली पण तो सापडला नाही. यानंतर महिलेने अपहरणाच्या भीतीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी यानंतर बेपत्ता मुलाचाशोध सुरू केला होता. काही दिवसांनी पोलिसांना एका तरुणीसोबत अल्पवयीन मुलगा सापडला.

मुलाने सांगितले धक्कादायक सत्य

यानंतर पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अल्पवयीन मुलाने सांगितले की, "राजस्थानमधील एका 19 वर्षीय तरुणीने मला फसवून गुजरातमध्ये नेले होते. तिथे मला टाइल बनवण्याच्या कारखान्यात कामाला लावले. ती मुलगी मला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती. मी घरच्यांना फोन करु नये म्हणून ती मुलगी मोबाईल स्वतःजवळच ठेवत होती."

दरम्यान, पीडित मुलाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तरुणीला अटक केली आणि तिच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तरुणीचा वैद्यकीय चाचणी केली असता मुलाने सत्य सांगितल्याचे समोर आले. 15 मार्च रोजी इंदूर हायकोर्टाने याप्रकरणी तरुणीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच पीडित मुलाला 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.